अ‍ॅपशहर

डोक्याला चेंडू लागल्याने तन्मय अगरवाल रुग्णालयात

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या क गटातील लढतीत हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवाल याला शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते आणि तो शुद्धीतही होता. तरीही त्याला रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करण्यात आली.

Maharashtra Times 24 Nov 2016, 12:48 am
वलसाड : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या क गटातील लढतीत हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवाल याला शॉर्टलेगला क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याने डोक्यावर हेल्मेट घातले होते आणि तो शुद्धीतही होता. तरीही त्याला रुग्णालयात नेऊन त्याची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hyderabad opener agarwal take to hospital after blow to head
डोक्याला चेंडू लागल्याने तन्मय अगरवाल रुग्णालयात


गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंच्या डोक्याला चेंडू लागण्याच्या अनेक घटना घडल्यामुळे तन्मयच्या या घटनेबद्दल चिंता प्रकट केली गेली.

छत्तीसगडविरुद्धच्या या लढतीत मनोजसिंगने मारलेला पूलचा फटका फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या तन्मयच्या डोक्याला लागला. २४ वर्षीय तन्मयला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याच्या डोक्याचे स्कॅनिंग करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दोन वर्षांपूर्वी तन्मयने रणजीत पदार्पण केले आहे आणि १८ सामने तो खेळला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज