अ‍ॅपशहर

मितालीला वगळणे चुकीचे

मिताली राज प्रकरणामुळे भारतातील महिला क्रिकेट ढवळून निघालेले असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मितालीला पाठिंबा दर्शविला आहे. मितालीला वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वगळण्यात आले होते. त्या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मितालीला वगळल्याचा फटका बसल्याची चर्चा सुरू झाली.

PTI 29 Nov 2018, 4:55 am
नवी दिल्ली: मिताली राज प्रकरणामुळे भारतातील महिला क्रिकेट ढवळून निघालेले असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मितालीला पाठिंबा दर्शविला आहे. मितालीला वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात वगळण्यात आले होते. त्या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मितालीला वगळल्याचा फटका बसल्याची चर्चा सुरू झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i feel sorry for mithali raj says sunil gavaskar
मितालीला वगळणे चुकीचे


गावस्कर यांनी मितालीला पाठिंबा दर्शविताना म्हटले आहे की, मला मितालीबद्दल सहानुभूती वाटते. तिचा मुद्दा योग्यच आहे. तिने २० वर्षे भारतीय क्रिकेटला दिली. वर्ल्डकपमधील दोन सामन्यात ती सर्वोत्तम खेळाडूही ठरली. तिला एका सामन्यात दुखापतीमुळे खेळता आले नाही. पण पुढच्या सामन्यात ती तंदुरुस्त होती. हीच परिस्थिती जर विराट कोहलीच्या बाबतीत असती तर विराटला संघाबाहेर बसवता आले असते का ? बाद फेरीसाठी तुम्ही सर्वोत्तम खेळाडूंना संधी द्यायला हवी. मितालीच्या अनुभवाचा उपयोग करून घेता आला असता.

रमेश पोवारबाबत गावस्कर म्हणाले की, इथे बसून पोवारबाबत बोलणे शक्य नाही. पण कारण काहीही असले तरी मितालीसारख्या संघाबाहेर बसवणे योग्य नव्हते. विजयी संघच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, हे कारण पुरेसे नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज