अ‍ॅपशहर

दुसऱ्या देशाकडून खेळणार : श्रीशांत

मॅचफिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयने घातलेली बंदी केरळ उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने अन्य देशाकडून खेळण्याचे संकेत दिले आहेत.

Maharashtra Times 21 Oct 2017, 3:48 am
नवी दिल्ली : मॅचफिक्सिंग प्रकरणात बीसीसीआयने घातलेली बंदी केरळ उच्च न्यायालयाने वैध ठरवल्यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने अन्य देशाकडून खेळण्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i will play for another country says sreesanth
दुसऱ्या देशाकडून खेळणार : श्रीशांत


‘माझ्यावर बीसीसीआयने भारतात खेळण्यास बंदी घातली आहे. आयसीसीने नव्हे. मी आता ३४ वर्षांचा आहे आणि आणखी सहा वर्षे सहजपणे क्रिकेट खेळू शकतो. बीसीसीआय ही एक खासगी संस्था आहे. त्यामुळे तिच्या नावाने खेळणारा संघ भारताचा संघ होऊ शकत नाही. हाच नियम अन्य देशातील क्रिकेट संघटनांनाही लागू होतो. त्यामुळे मी तिथून खेळण्याबाबत विचार करू शकतो,’ असे श्रीशांत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज