अ‍ॅपशहर

विश्वचषकः अवघे विश्व न्हाऊन निघणार क्रिकेटरंगात!

तब्बल १५० खेळाडू आणि १० संघांतील तुंबळ लढती वन-डे क्रिकेट वर्ल्डकपच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये आज, गुरुवारपासून अनुभवायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या या वाटचालीत कोण धावचीत होणार, कोण नांगर टाकून शेवटपर्यंत टिकून राहणार हे या स्पर्धेच्या दीड महिन्याच्या कालावधीत जगभरातील तमाम चाहत्यांना पाहता येणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज होणाऱ्या लढतीने या स्पर्धेचा आरंभ होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 30 May 2019, 12:06 pm
वृत्तसंस्था, लंडन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम world-cup

तब्बल १५० खेळाडू आणि १० संघांतील तुंबळ लढती वन-डे क्रिकेट वर्ल्डकपच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये आज, गुरुवारपासून अनुभवायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या या वाटचालीत कोण धावचीत होणार, कोण नांगर टाकून शेवटपर्यंत टिकून राहणार हे या स्पर्धेच्या दीड महिन्याच्या कालावधीत जगभरातील तमाम चाहत्यांना पाहता येणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज होणाऱ्या लढतीने या स्पर्धेचा आरंभ होणार आहे.

या वर्ल्डकपचा ढाचा बदलण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाला नऊ सामने खेळायला मिळणार आहेत. त्यातील चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ९ आणि ११ जुलैला उपांत्य लढती रंगणार असून १४ जुलैला अंतिम सामना खेळविला जाईल. उपांत्य फेरीसाठी एखाद्या संघाला नऊपैकी किमान पाच सामने जिंकावे लागतील. १९८३ आणि २०११मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारताकडून नेहमीप्रमाणे प्रचंड अपेक्षा आहेतच; पण यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे संघही विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान यांच्याकडूनही चोख प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेशी ५ जूनला होणार आहे. पण तेवढेच आकर्षण असेल ते १६ जूनला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचे.

भारताच्या वर्ल्डकपमधील लढती

५ जून : दक्षिण आफ्रिका (साऊदम्प्टन)

९ जून : ऑस्ट्रेलिया (ओव्हल)

१३ जून : न्यूझीलंड (नॉटिंगहॅम)

१६ जून : पाकिस्तान (मँचेस्टर)

२२ जून : अफगाणिस्तान (साऊदम्प्टन)

२७ जून : वेस्ट इंडिज (मँचेस्टर)

३० जून : इंग्लंड (बर्मिंगहॅम)

२ जुलै : बांगलादेश (बर्मिंगहॅम)

६ जुलै : श्रीलंका (लीड्स)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज