कृणाल, चहर संघात
नवी दिल्ली : अष्टपैलू कृणाल पंड्या आणि मध्यमगती गोलंदाज दीपक चहार यांना इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांना दुखापत झाल्याने त्यांच्या जागी पंड्या आणि चहारला स्थान देण्यात आले आहे. मालिकेतील पहिली लढत ३ जुलैपासून खेळली जाणार आहे. मात्र, या दोघांचा समावेश केवळ टी-२० मालिकेसाठी आहे. वन-डेत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे. कृणाल आणि हार्दिक यांच्या रुपाने भाऊ असलेली तिसरी जोडी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. यापूर्वी मोहिंदर-सुरिंदर अमरनाथ, इरफान-युसूफ पठाण या बंधूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.