अ‍ॅपशहर

मानधनाचा समावेश

मलेशियात होणाऱ्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी पंधरा सदस्यीय भारतीय महिला संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली...

Maharashtra Times 28 Apr 2018, 5:00 am

स्मृती मानधना

भारतीय संघात

नवी दिल्ली : मलेशियात होणाऱ्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी पंधरा सदस्यीय भारतीय महिला संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्राची स्मृती मानधना संघाची उपकॅप्टन असेल. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि यजमान मलेशिया संघाचा समावेश आहे. ही स्पर्धा १ ते ११ जूनदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळेल आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत दाखल होतील. भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (उपकॅप्टन), मिथाली राज, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, वेदा कृष्णमूर्ती, तनिया भाटिया, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, शिखा पांडे, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, एकता बिश्त, मोना मेश्राम.

...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज