अ‍ॅपशहर

Ben Stokes: स्टोक्स दुसऱ्या कसोटीतून बाहेर

पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीसह तीन फलंदाजांना बाद करून इंग्लंडला विजयश्री मिळवून देणारा बेन स्टोक्स हा ९ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Aug 2018, 10:28 am
बर्मिंगहॅम:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stokes


पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीसह तीन फलंदाजांना बाद करून इंग्लंडला विजयश्री मिळवून देणारा बेन स्टोक्स हा ९ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका नाइट क्लबबाहेर झालेल्या हाणामारी प्रकरणी बेन स्टोक्सला सोमवारी न्यायालयात हजर व्हायचे आहे. त्यामुळं स्टोक्स दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असं सांगितलं जातंय. स्टोक्स दुसऱ्या कसोटीत न खेळल्यास इंग्लंड संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज