अ‍ॅपशहर

कर्ण, नदीम चमकले; भारत ‘अ’चा विजय

फिरकीपटू कर्ण शर्मा, शाहबाझ नदीम यांची अचूक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने चारदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघावर एक डाव आणि ३१ धावांनी दणदणीत विजय नोंदविला.

Maharashtra Times 26 Sep 2017, 1:01 am
वृत्तसंस्था, विजयवाडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india a beat nz a
कर्ण, नदीम चमकले; भारत ‘अ’चा विजय


फिरकीपटू कर्ण शर्मा, शाहबाझ नदीम यांची अचूक गोलंदाजी आणि श्रेयस अय्यरच्या शतकाच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने चारदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघावर एक डाव आणि ३१ धावांनी दणदणीत विजय नोंदविला. यासह भारत ‘अ’ संघाने दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारत ‘अ’ संघाने कर्ण आणि शाहबाज यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड ‘अ’ संघाचा पहिला डाव १४७ धावांतच गुंडाळला होता. प्रत्युत्तर देताना श्रेयस अय्यरचे शतक आणि रवीकुमार समर्थ, रिषभ पंत यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने ३२० धावांपर्यंत मजल मारली होती. अर्थात, पहिल्या डावात भारत ‘अ’ संघाला १७३ धावांची आघाडी मिळविली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंड ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ६४ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड ‘अ’ संघ कशी झुंज देतो, याबाबत उत्सुकता होती. तिसऱ्या दिवसाच्या सहाव्या षटकात कर्णने सलामीवीर जॉर्ज वर्करचा त्रिफळा उडविला. त्यानंतर कर्ण, शाहबाझ आणि शार्दुल ठाकूर यांच्या अचूक गोलंदाजीसमोर न्यूझीलंड ‘अ’ संघाचा डाव स्थिरावला नाही. अखेरीस न्यूझीलंड ‘अ’चा डाव १४२ धावांतच गारद झाला. कर्ण आणि शाहबाझ यांनी सामन्यात प्रत्येकी आठ बळी मिळविले. पहिल्या डावात कर्णने ५८ धावांत ४, तर शाहबाझने ३९ धावांत चार बळी मिळविले होते, तर दुसऱ्या डावात कर्णने ६२ धावांत ४, तर शाहबाझने ५१ धावांत ४ बळी मिळविले. दुसरी लढत ३० सप्टेंबरपासून सुरू होईल.

स्कोअरबोर्ड : न्यूझीलंड ‘अ’ पहिला डाव – सर्वबाद १४७ आणि दुसरा डाव – ६३.१ षटकांत सर्वबाद १४२ (जॉर्ज वर्कर ३५, जीत रावल २१, शाहबाझ नदीम ४-५१, कर्ण शर्मा ४-६२, शार्दुल ठाकूर २-१७) पराभूत वि. भारत ‘अ’ पहिला डाव – ६७.२ षटकांत सर्वबाद ३२० (श्रेयस अय्यर १०८, रिषभ पंत ६७, रवीकुमार समर्थ ५४).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज