अ‍ॅपशहर

‘अ’ संघाचा डावाने विजय

फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा आणि शाहबाझ नदीम यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या ‘अनऑफिशल’ चारदिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघावर १ डाव अन् २६ धावांनी मात केली. यासह भारत ‘अ’ संघाने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

Maharashtra Times 4 Oct 2017, 1:30 am
वृत्तसंस्था, विजयवाडा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india a trounce new zealand a by innings 26 runs to win 2 0
‘अ’ संघाचा डावाने विजय


फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा आणि शाहबाझ नदीम यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने दुसऱ्या ‘अनऑफिशल’ चारदिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात न्यूझीलंड ‘अ’ संघावर १ डाव अन् २६ धावांनी मात केली. यासह भारत ‘अ’ संघाने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंड ‘अ’ संघाला पहिल्या डावात २११ धावांत गुंडाळले होते. यानंतर अंकित बावणेच्या नाबाद १६२ धावांच्या जोरावर भारताने ४४७ धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावात २३६ धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद १०४ अशी चांगली सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळच्या सत्रात नदीमने जयला पायचीत टिपले. जय १४८ चेंडूंत ६ चौकारांसह ४७ धावांवर बाद झाला. जय- हेन्री निकोलसने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.

यानंतर कर्णधार निकोलने एका बाजूने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला फारशी साथ लाभली नाही. एक वेळ न्यूझीलंडने ३ बाद १७५ धावा केल्या होत्या. यानंतर न्यूझीलंडचे सात फलंदाज अवघ्या ३५ धावांत माघारी परतले. न्यूझीलंडचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. निकोलसचे शतक सहा धावांनी हुकले. त्याने १९० चेंडूंत ११ चौकार व १ षटकारसह ९४ धावा केल्या. न्यूझीलंडच्या चौघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. कर्ण शर्माने न्यूझीलंडचा निम्मा संघ गारद केला, तर नदीमने चौघांना बाद केले. या कसोटीत कर्ण शर्माने आठ विकेट घेतल्या. विशेष म्हणजे पहिल्या कसोटीतही कर्ण शर्माने आठ गडी बाद केले होते. भारत अ संघाने पहिली कसोटी एक डाव अन् ३१ धावांनी जिंकली होती.

स्कोअरबोर्डः न्यूझीलंड ‘अ’ २११ आणि ७९.३ षटकांत २१० (हेन्री निकोलस ९४, जय रावल ४७, कर्ण शर्मा २०.३-२-७८-५, शाहबाझ नदीम २६-९-४१-४) पराभूत वि. भारत ‘अ’ ४४७.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज