अ‍ॅपशहर

टीम इंडियाला पुजाराचा 'साहा'रा

श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव १७२ धावांवर आटोपला आहे. चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहासोबत तळाच्या फलंदाजांनी लावलेल्या हातभारामुळे भारताला दीडशतकी टप्पा ओलंडता आला. आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर पुढचं सगळं गणित ठरणार आहे.

Maharashtra Times 18 Nov 2017, 12:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india all out for 172 against sri lanka in kolkata test
टीम इंडियाला पुजाराचा 'साहा'रा


श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव १७२ धावांवर आटोपला आहे. चेतेश्वर पुजाराचं अर्धशतक आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहासोबत तळाच्या फलंदाजांनी लावलेल्या हातभारामुळे भारताला दीडशतकी टप्पा ओलंडता आला. आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर पुढचं सगळं गणित ठरणार आहे.

कोलकाता कसोटीत पहिले दोन दिवस पावसाने खेळखंडोबा केला. पहिल्या दिवशी फक्त ११.५ षटकांचा खेळ झाला, पण या १२ षटकांनीच विराटसेनेचे बारा वाजवले. लंकेचा तेजतर्रार गोलंदाज लकमलने सहाच्या सहा षटकं निर्धाव टाकली होती आणि तीन तगड्या फलंदाजांना माघारीही धाडलं होतं. या धक्क्यातून टीम इंडियाला सावरण्याचा प्रयत्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारानं केला. पण तो 'सेट' झाला असतानाच पाऊस आडवा आला होता.

कोलकाता कसोटीः LIVE स्कोअरकार्ड पाहण्यासाठी इथे क्लिक करा

आज तिसऱ्या दिवशीचा खेळ लख्खं सूर्यप्रकाशात सुरू झाला. टीम इंडियाने ५ बाद ७४ या कालच्या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. रथी-महारथी तंबूत असताना, अर्धा संघ कुठवर मजल मारणार, असा प्रश्न होता. पुजारा, साहा आणि रवींद्र जाडेजाकडून क्रिकेटप्रेमींना आशा होती. पण, पुजारा पाच धावांची भर घालून बाद झाला आणि पारडं पुन्हा लंकेकडे झुकलं. भारत शंभरी तर गाठतो की नाही, असं वाटू लागलं. पण साहा (२९), रवींद्र जाडेजा (२२) आणि मोहम्मद शामी (२४) हे त्रिकूट टीम इंडियाला १७२ पर्यंत घेऊन गेले.

श्रीलंकेसाठी सुरंगा लकमलनं ४, तर लाहिरू गमागे, दासून शनाका आणि दिलरुवान परेरा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज