अ‍ॅपशहर

म्हणे, विराट बालिश, दर्जाहीन आणि गर्विष्ठ!

'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं' या उक्तीनुसारच वागणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केलं आहे. रडीचा आणि चिडीचा डाव खेळणाऱ्या 'स्टीव्हबाब्या'च्या खिलाडूवृत्तीचे दाखले देत त्यांनी विराटवर 'गर्विष्ठ कार्टं' असं शेरा मारलाय.

Maharashtra Times 29 Mar 2017, 4:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india v australia aussie media slams classless virat kohli
म्हणे, विराट बालिश, दर्जाहीन आणि गर्विष्ठ!


'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं' या उक्तीनुसारच वागणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केलं आहे. रडीचा आणि चिडीचा डाव खेळणाऱ्या 'स्टीव्हबाब्या'च्या खिलाडूवृत्तीचे दाखले देत त्यांनी विराटवर 'गर्विष्ठ कार्टं' असं शेरा मारलाय. भारताकडून झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचंच त्यातून स्पष्ट होतंय.

ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंशी आता मैत्री होऊ शकत नाही, असा स्ट्रेट ड्राइव्ह हाणत विराट कोहलीनं काल स्मिथ कंपनीला त्यांची जागा दाखवली होती. त्याची हीच टिप्पणी ऑस्ट्रेलियन मीडियाला बोचली आहे. विराट कोहलीचं वर्तन दर्जाहीन आणि बालिशपणाचं असल्याची टीका तिथल्या वृत्तपत्रांनी केली आहे.

विराट कोहली खूप अहंकारी आहे. मालिका जिंकल्यानंतर झालं गेलं विसरून त्यानं मैत्रीचा हात पुढे करायला हवा होता, पण तो अगदीच लहान मुलासारखा वागला, असं सिडनीच्या टेलिग्राफने म्हटलंय.

अन्य एका वृत्तपत्रातील बातमीचं शीर्षक, 'बीअरगेटः कोहलीचं ताजं दर्जाहीन वर्तन' (Beergate: Kohli's latest classless act) असं आहे. मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं एकत्र बीअर प्यायची ऑफर दिली होती. त्यांचं हे वागणं खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध असल्याची शेरेबाजी पीटर लेलॉर यांनी केली आहे.

'हेराल्ड सन' वृत्तपत्रानं कोहलीची तुलना स्मिथशी करून कहरच केलाय. मुरली विजयला शिवी दिल्यानंतर स्मिथने त्याची माफी मागतली होती. कोहलीनंही आपल्या विधानाबद्दल माफी मागायला हवी होती, असं तर्कट त्यांनी मांडलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज