अ‍ॅपशहर

लोकेश राहुलचे द्विशतक एका धावेने हुकले

भारत-इंग्लंड मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४७७ धावांच्या बदल्यात भारताने आज तिसऱ्या दिवसअखेर चार गड्यांच्या मोबदल्यात ३९१ धावा ठोकल्या. सलामीवीर लोकेश राहुलने खणखणीत दीडशतक ठोकून भारताच्या डावाला आकार दिला.

Maharashtra Times 18 Dec 2016, 6:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india v england 5th test day 3 rahuls 199 drives india to commanding position
लोकेश राहुलचे द्विशतक एका धावेने हुकले


भारत-इंग्लंड मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ४७७ धावांच्या बदल्यात भारताने आज तिसऱ्या दिवसअखेर चार गड्यांच्या मोबदल्यात ३९१ धावा ठोकल्या. सलामीवीर लोकेश राहुलने खणखणीत दीडशतक ठोकून भारताच्या डावाला आकार दिला. पार्थिव पटेल (७१) आणि करुण नायर (नाबाद ७१) यांनी राहुलला सुरेख साथ दिली. दरम्यान, झुंजार खेळी करणाऱ्या राहुलचं द्विशतक अवघ्या एका धावेने हुकलं. आदिल रशिदच्या चेंडूवर बटलरकडे झेल देऊन राहुल १९९ धावांवर बाद झाला.

कालच्या बिनबाद ६० धावांवरून आज फलंदाजीला उतरलेल्या लोकेश राहुल आणि पार्थिव पटेल या सलामीच्या जोडीने भारताला दीडशतकी मजल मारून दिली. १५२ धावांवर पार्थिवच्या रूपाने भारताने पहिला गडी गमावला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फार काळ साथ देऊ शकले नाहीत. पुजारा १६ तर विराट १५ धावा करून बाद झाला. त्यामुळे ३ बाद २११ अशी भारताची अवस्था झाली.

स्कोअरकार्ड

विराट बाद झाल्याने पाहुण्या संघाने आक्रमक रणनिती अवलंबली. मात्र नवख्या करुण नायरने चिवट खेळाचे दर्शन घडवत राहुलला सुरेख साथ दिली. राहुल आणि करुण यांनी चौथ्या विकेटसाठी १६१ धावांची भागिदारी रचली आणि भारताची चिंता दूर केली. भारत अद्यापि ८६ धावांनी पीछाडीवर असला तरी भारताच्या हातात सहा गडी असून चौथ्या दिवशी इंग्लंडवर महत्त्वपूर्ण आघाडी मिळवण्याची भारताकडे संधी आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज