अ‍ॅपशहर

पावसाचा 'खेळ'; भारताचा अर्धा संघ तंबूत

कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळाचा 'खेळखंडोबा' झाला आहे. आजही केवळ ३२.५ षटकांचा सामना होऊ शकला. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताची ५ बाद ७४ अशी दयनीय अवस्था झाली असून ४७ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पुजारावर सगळी मदार उरली आहे.

Maharashtra Times 17 Nov 2017, 4:38 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india v sri lanka 1st test cheteshwar pujara fights before rain washes out day 2
पावसाचा 'खेळ'; भारताचा अर्धा संघ तंबूत


कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळाचा 'खेळखंडोबा' झाला आहे. आजही केवळ ३२.५ षटकांचा सामना होऊ शकला. आजचा खेळ थांबला तेव्हा भारताची ५ बाद ७४ अशी दयनीय अवस्था झाली असून ४७ धावांवर नाबाद असलेला चेतेश्वर पुजारावर सगळी मदार उरली आहे. दरम्यान, काल पहिल्या दिवशीही पावसाच्या व्यत्ययामुळे ११.५ षटकांचाच खेळ होऊ शकला होता.

कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन तासांचा खेळ झाल्यानंतर पावसाने 'एंट्री' केली. त्यानंतर वेळ वाचवण्यासाठी लंच आणि चहापान वेळेआधी उरकण्यात आले. मात्र, पाऊस न थांबल्याने पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. पंचांनी स्थिती लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

त्याआधी दुसऱ्या दिवसाचा खेळ सकाळी सव्वानऊ वाजता सुरू झाला. सुरुवातीलाच भारताला अजिंक्य रहाणेच्या रूपाने चौथा धक्का बसला. त्यानंतर रविचंद्रन अश्विनही अवघ्या ४ धावांची भर घालून तंबूत परतला. एकीकडे पुजाराने खेळपट्टीवर जम बसवला असताना त्याला कुणाचीच साथ मिळू शकली नाही. भारतीय डावाची संपूर्ण मदार आता पुजारावरच असून साहा आणि तळाच्या फलदांजांच्या मदतीने पुजारा भारतीय डाव सावरणार का?, हे पाहावे लागणार आहे.

भारत वि. श्रीलंका पहिल्या कसोटीचे स्कोअरकार्ड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज