अ‍ॅपशहर

कांगारूंचा कडवा प्रतिकार; रांची कसोटी अनिर्णित

ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्श आणि पिटर हॅन्ड्सकॉम्ब यांनी पाचव्या विकेटसाठी रचलेल्या भक्कम भागिदारीमुळे तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. द्विशतकवीर चेतेश्वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Maharashtra Times 20 Mar 2017, 6:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । रांची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india vs australia ranchi test draw
कांगारूंचा कडवा प्रतिकार; रांची कसोटी अनिर्णित


ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्श आणि पिटर हॅन्ड्सकॉम्ब यांनी पाचव्या विकेटसाठी रचलेल्या भक्कम भागिदारीमुळे तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे कसोटी सामन्यावर वर्चस्व मिळवलेल्या भारतीय संघाला विजयापासून दूर रहावे लागले. द्विशतकवीर चेतेश्वर पुजारा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

रांची कसोटीच्या शेवटच्या पाचव्या दिवसाची सुरूवात झाली तेव्हा भारताला विजयासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे आठ गडी बाद करण्याचे आव्हान होते. कालच्या दोन बाद २३ धावसंख्येवरून खेळताना स्टीव स्मिथ आणि मॅट रेनशॉ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, २९ व्या षटकात इशांत शर्माने रेनशॉला बाद करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. त्यानंतर रविंद्र जडेजाने स्टीव स्मिथला त्रिफळाचित करत पाहुण्यांवर दबाव वाढवला. त्यानंतर मैदानावर आलेल्या शॉन मार्श आणि पिटर हॅन्ड्सकॉम्ब यांनी पाचव्या विकेटसाठी ६२ षटके खेळपट्टीवर ठाण मांडत १२४ धावांची भागिदारी रचली. अखेर ९२ व्या षटकात मार्शला बाद करण्यात भारताला यश आले. अश्विनने त्यानंतर मॅक्सवेलला बाद केले. मात्र, तोपर्यंत सामना अनिर्णितावस्थेकडे पोहचला होता. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. कसोटी मालिकेतील अंतिम सामना २५ मार्चपासून धरमशाला येथे सुरू होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज