अ‍ॅपशहर

Ind vs Eng Test: भारताचा ३१ धावांनी पराभव

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करत कडवी झुंज दिली पण तो बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. नंतर मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव १६२ धावांवर आटोपला. विराटची झुंज अपयशी ठरली आणि भारताचा पराभव झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Aug 2018, 5:16 pm
बर्मिंगहॅम :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indvseng


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण करत कडवी झुंज दिली पण तो बाद झाल्यानंतर भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. नंतर मोहम्मद शमी, इशांत शर्मा असे गडी बाद होत गेले आणि भारताचा डाव १६२ धावांवर आटोपला. विराटची झुंज अपयशी ठरली आणि भारताचा पराभव झाला.

आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी ८४ धावांची आवश्यकता होती. पण सामना सुरू होताच दिनेश कार्तिकला पहिल्याच षटकात अँडरसनने बाद केले आणि तिथून भारताची घसरण सुरू झाली. कर्णधार विराट कोहलीकडून क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले पण ५१ धावांवर गोलंदाज बेन स्टोक्सने त्याला पायचीत केले.

विराटपाठोपाठ मोहम्मद शमीदेखील बाद झाला. त्याचा बळीही बेन स्टोक्सनेच घेतला आणि भारताच्या अडचणीत वाढ झाली. त्यानंतर इशांत शर्माही पायचीत झाला. हार्दिक पंड्याही झेलबाद झाला आणि भारताचा डाव १६२ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये बेन स्टोक्सने चार गडी बाद करत इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. इंग्लंडची ही एक हजारावी कसोटी होती.

दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडला भारताने १८० धावांत रोखले होते. पहिल्या डावातील १३ धावांची आघाडीमुळे इंग्लंडने भारतासमोर १९४ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ ७८ धावांत माघारी परतला. या वेळीही अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला विराट कोहलीने सावरले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने ५ बाद ११० धावा केल्या होत्या. पण विराट बाद झाला आणि भारताचे विजयाचे स्वप्न धुळीला मिळाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज