अ‍ॅपशहर

भारताचा आयर्लंडवर १४३ धावांनी दणदणीत विजय

सलामीवीर लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात आयर्लंडसमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले.

Maharashtra Times 30 Jun 2018, 1:42 am
वृत्तसंस्था, डब्लिन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cricket


सलामीवीर लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात आयर्लंडसमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले.

आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलामीला आलेला कर्णधार विराट कोहली केवळ ९ धावा करून परतला. चेसने डॉकरेलकरवी विराटला झेलबाद केले. त्यानंतर लोकेश राहुल आणि सुरेश रैना यांनी भारताला सव्वाशे धावांचा टप्पा पार करून दिला. तेराव्या षटकात ओब्रायनने लोकेश राहुलला बाद करत ही जोडी फोडली. लोकेश राहुलने ३६ चेंडूंत ३ चौकार आणि ६ षटकारांसह ७० धावांची खेळी केली. लोकेश राहुल-रैना यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. गेल्या सामन्यात ९७ धावांची तडाखेबंद खेळी करणारा मुंबईकर रोहित शर्मा या सामन्यात मात्र खातेही उघडू शकला नाही. केविन ओब्रायनने त्याला बाद केले. त्यानंतर रैनाने मनीष पांडेच्या साथीत भारताला दीडशे धावांचा टप्पा पार करून दिला. १८व्या षटकात केविन ओब्रायनने रैनाला बाद केले. रैनाने ४५ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. त्यानंतर मनीष पांडे आणि हार्दिक पंड्या यांनी भारताला २१३ धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकने ९ चेंडूंत १ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ३२ धावांची, तर मनीषने २० चेंडूंत एका चौकारासह नाबाद २१ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : भारत - २० षटकांत ४ बाद २१३ (लोकेश राहुल ७०, सुरेश रैना ६९, मनीष पांडे नाबाद २१, हार्दिक पंड्या नाबाद ३२, केविन ओब्रायन ३-४०) वि. आयर्लंड (अपूर्ण)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज