अ‍ॅपशहर

धोनीने वरच्या क्रमांकावर खेळायला हवे होते : गावस्कर

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीनंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीदेखील महेंद्रसिंह धोनीच्या उपांत्यफेरीतील फलंदाजीच्या क्रमावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर धोनीने फलंदाजीसाठी येणे अपेक्षित होते, असे मत माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2019, 7:58 pm
नवी दिल्लीः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ms-dhoni

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीनंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीदेखील महेंद्रसिंह धोनीच्या उपांत्यफेरीतील फलंदाजीच्या क्रमावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचे आघाडीचे तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर धोनीने फलंदाजीसाठी येणे अपेक्षित होते, असे मत माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात परिस्थितीप्रमाणे बदल होत राहिले पाहिजेत, अशी भूमिका गावस्कर यांनी नेहमी मांडली आहे. मात्र न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे गावस्कर नाराज झाले आहे. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत फलंदाजी करण्यास मैदानात उतरले होते. या दोन्ही फलंदाजांची खेळण्याची शैली एकसारखी आहे. त्यांच्या जागी धोनीने फलंदाजीसाठी यायला हवे होते. धोनीने पंतला संयमितपणे खेळण्याचा सल्ला दिला असता. मात्र, तसे झाले नाही. पंत चुकीचा फटका मारून बाद झाला. ती चूक भारताला महागात पडली, असे गावस्कर यांनी नमूद केले.

विराट कोहलीने धोनीला उपांत्य फेरीत फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर पाठवले. संपूर्ण स्पर्धेत धोनी एवढ्या खालच्या स्थानावर खेळला नव्हता. सामन्यातील परिस्थितीला धोनी योग्यरित्या सामोरा गेला. यामुळेच आम्ही त्याला उशिरा फलंदाजीसाठी उतरवले. धोनी लवकर बाद झाल्याने आमची रणनीती फसली, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज