अ‍ॅपशहर

टीम इंडियाच्या पाठीशी 'आईचा आशीर्वाद'

'आईचा आशीर्वाद' हे वाक्य आपण अनेक वाहनांच्या मागे लिहिलेलं पाहिलंय. तसंच काहीसं चित्र आज भारत-न्यूझीलंडमधील शेवटच्या वनडेत विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर पाहायला मिळतंय. टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांच्या टी-शर्टवर आज त्यांच्या आईचं नाव झळकतंय.

Maharashtra Times 29 Oct 2016, 5:29 pm
मटा ऑनलाइन वृत्त । विशाखापट्टणम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian cricketer with their mothers name on their jersey
टीम इंडियाच्या पाठीशी 'आईचा आशीर्वाद'


'आईचा आशीर्वाद' हे वाक्य आपण अनेक वाहनांच्या मागे लिहिलेलं पाहिलंय. तसंच काहीसं चित्र आज भारत-न्यूझीलंडमधील शेवटच्या वनडेत विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर पाहायला मिळतंय. टीम इंडियाच्या सर्व शिलेदारांच्या जर्सीवर आज त्यांच्या आईचं नाव झळकतंय. त्यामुळे 'करो या मरो'च्या लढतीत धोनीसेनेच्या पाठीशी 'मातृशक्ती'च उभी आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

स्टार प्लसच्या 'नई सोच' अभियानात 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सहभागी झाले आहेत. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी, पुरुषप्रधान समाजात महिलांनाही मानाचं स्थान मिळावं, या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येतंय. त्याच्या जाहिरातीत धोनी, कोहली आणि रहाणेच्या जर्सीवर आईचं नाव पाहायला मिळालं होतं. परंतु आज विशाखापट्टणमच्या मैदानावर टीम इंडियाचे शिलेदार राष्ट्रगीतासाठी उभे असताना प्रत्येकाच्याच जर्सीवर आईचं नाव झळकत होतं. ते पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

ऐन दिवाळीत, टीम इंडियानं मातृत्वाचा आगळावेगळा गौरव केल्यानं सोशल मीडियावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. #TeamIndia sporting their mothers' names on the jersey in the 5th and final ODI #INDvNZ pic.twitter.com/pWcMAKMchB — BCCI (@BCCI) October 29, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज