अ‍ॅपशहर

‘बेंगळुरू’ची विजयाने सांगता

नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रविवारी दहाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १० धावांनी मात केली. अर्थात, ‘बेंगळुरू’ने मोसमाची सांगता विजयाने केली.

Maharashtra Times 15 May 2017, 6:25 am
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने रविवारी दहाव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर १० धावांनी मात केली. अर्थात, ‘बेंगळुरू’ने मोसमाची सांगता विजयाने केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl 2017 royal challengers bangalore beat delhi daredevils for consolation win
‘बेंगळुरू’ची विजयाने सांगता


प्रथम फलंदाजी करताना ‘बेंगळुरू’ने निर्धारित २० षटकांत १६१ धावांपर्यंत मजल मारली. त्यात कर्णधार विराट कोहलीने ४५ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तर देताना दिल्ली डेअरडेव्हिल्सला १५१ धावांपर्यंतच मजल मारता आली. संक्षिप्त धावफलक ः बेंगळुरू – ६ बाद १६१ (विराट कोहली ५८, ख्रिस गेल ४८, पवन नेगी नाबाद १३, केदार जाधव १२, पॅट कमिन्स ४-०-२१-२) वि.वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स – २० षटकांत सर्वबाद १५१ (रिषभ पंत ४५, श्रेयस अय्यर ३२, करुण नायर २६, महंमद शमी २१, हर्षल पटेल ४-०-४३-३; पवन नेगी २-०-१०-३).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज