अ‍ॅपशहर

IPL Auction 2019 LIVE: आयपीएल लिलाव प्रक्रियेला सुरुवात

​आयपीएल २०१९ साठी आज खेळाडूंचा लिलाव जयपूरमध्ये करण्यात येत आहे. दुपारी अडीच वाजता ही लिलाव प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ३५० खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2018, 6:54 pm
जयपूरः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IPL


आयपीएल २०१९ साठी आज खेळाडूंचा लिलाव जयपूरमध्ये करण्यात येत आहे. दुपारी अडीच वाजता ही लिलाव प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ३५० खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहेत. या लिलाव प्रक्रियेत अनेक खेळाडूंवर बोली लागल्या नाहीत. या प्रक्रियेचे अपडेट्स..

>>साउथ आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनला संघात घेण्यास मालक अनुत्सुक; लागली नाही एकही बोली

>>अक्षर पटेलवर लागली ५ कोटींची बोली; दिल्ली कॅपिटल्सनं केलं खरेदी

>>लोकी फर्ग्युसनला कोलकाता नाइट रायडर्सनं १.६० कोटींना केलं खरेदी

>>बरिंदर सरन खेळणार मुंबई इंडियन्सकडून; ३.४ कोटींना केलं खरेदी

>>सैन करन पंजाबकडून खेळणार; ७.२० कोटींना केलं खरेदी, सर्वात मोठी बोली लागलेला पहिला विदेशी खेळाडू ठरला

>>ऋषि धवन, कोरी अँडरसन, जेसन होल्डर यांच्यावरही बोली लागली नाही

>>कॉलिन इनग्राम दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार; ६.४ कोटींना केलं खरेदी

>>न्यूझीलँडच्या जेम्स नीशमवरही लागली नाही बोली; ७५ लाख होतं बेस प्राइस

>>ऑस्ट्रेलियाचा शॉर्न मार्श, साऊथ आफ्रिकेचा हाशिम आमला आणि भारताचा सौरभ तिवारी यांच्यावर लागली नाही बोली

>>उस्मान ख्वाजावर लागली नाही बोली; १ कोटी होतं बेस प्राइस

>>वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन पंजाब संघाकडून खेळणार; ४.२० कोटीच्या बोलीवर केलं खरेदी

>>ऋद्धिमन साहाला १.२० कोटीच्या बोलीवर सनराइझर्स हैदराबादने केलं खरेदी

>>रजनीश गुरबानी, चामा मिलिंग, अनिकेत चौधरी, इशान पोरेल यांच्यावर लागली नाही बोली

>>तामिळनाडूचा युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला ८.४ कोटींना पंजाबनं केलं खरेदी; बेस प्राइस होतं २० लाख

>>अंकूश बेस याला दिल्ली कॅपिटल्स संघानं २० लाखांना केलं खरेदी

>>मुंबई आणि बंगळुरूमध्ये शिवम दुबेच्या खरेदीवरून चढाओढ; बंगळुरूने बाजी मारत ५ कोटींना केलं खरोदी

>>सरफराज खान खेळणार पंजाबकडून; २५ लाखांना केलं खरेदी

>>मनन वोहरा, सचिन बेबी, अंकित बवाने यांना केलं नाही खरेदी

>>राहुल शर्मा, ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम जंपा, फवाद अहमद यांच्यावर लागली नाही बोली

>>मोहित शर्मा चेन्नईच्या संघातून खेळणार; बेस प्राइसपेक्षा १० टक्के जास्त लागली बोली, ५ कोटींना केलं खरेदी

>>वरुण अॅरॉनला २.४० कोटींना राजस्थान रॉयल्सनं केलं खरेदी

>>मोहम्मद शामी खेळणार पंजाबमधून; ४.८ कोटींना केलं खरेदी

>>लसिथ मलिंगाला मुंबई इंडियन्स केलं २ कोटींना खरेदी

>>जयदेव उनाडकटला ८.४ कोटींना राजस्थान रॉयल्सनं केलं खरेदी

>>हनुमा विहारी (२ कोटी) शिमरॉन हेटमायर (४.२ कोटी) कार्लोस ब्रेथवेट (५ कोटी) गुरकीरत सिंह (५० लाख) मोजिज हेनरीकेस (१ कोटी) अक्षर पटेल (५ कोटी) जॉनी बेयरस्टो (२.२ कोटी) निकोलस पूरन (४.२ कोटी) ऋद्धिमान साहा (१.२ कोटी) यांना केलं खरेदी

>>हनुमा विहारीला २ कोटी रुपयांना केलं खरेदी; दिल्ली कॅपिटल्सनं लावली बोली

>>चेतेश्वर पुजाराच्या नावावर कोणी शिक्कामोर्तब केले नाही

>>मनोज तिवारीला ५० लाखांची पहिली बोली

>>मार्टिन गप्टिल, अॅलेक्स हेल्स, शिमरॉन हेटमायर, ब्रँडम मॅक्युलम, चेतेश्वर पुजारा, मनोज तिवारी आणि हनुमा विहारी यांच्या नावावर लागणार बोली

>>इंडियन प्रीमियर लीग २०१९ च्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज