अ‍ॅपशहर

IPL फायनलआधी धोनीचा लुंगी डान्स व्हायरल

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आयपीएल १० च्या फायनलआधी चांगलाच मूडमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये धोनी प्रसिद्ध कोरियोग्राफ आणि दिग्दर्शक प्रभू देवासोबत लुंगी डान्स करताना दिसत आहे.

Maharashtra Times 20 May 2017, 5:05 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl ms dhoni learning dance from prabhu deva video goes viral
IPL फायनलआधी धोनीचा लुंगी डान्स व्हायरल


भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आयपीएल १० च्या फायनलआधी चांगलाच मूडमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये धोनी प्रसिद्ध कोरियोग्राफ आणि दिग्दर्शक प्रभू देवासोबत लुंगी डान्स करताना दिसत आहे. लुंगी डान्स कसा करावा याच्या खास टिप्स प्रभूदेवा धोनीला देताना दिसत आहे.

आयपीएलच्या सुरुवातीला सुद्धा धोनीचा एक व्हिडिओ डान्स व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये माहीसोबत पुणे संघाचा खेळाडू बेन स्टोक्स दिसला होता. या नव्या व्हिडिओमध्ये धोनीने पांढरा धोतर आणि पिवळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे दिसत आहे. तर प्रभूदेवानं पांढरा शर्ट आणि पांढरे धोतर घातल्याचे दिसत आहे. दोघेही डान्सच्या खास मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.




या व्हिडिओत धोनीने लुंगी घातली यात नवीन असं काही नाही. ८ वर्षापर्यंत धोनीनं आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद सांभाळले आहे. त्या दरम्यान धोनीनं जाहीरात शूटवेळी अनेकदा लुंगी घातली आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये धोनीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड आहे. धोनी सातव्यांदा आयपीएलचा फायनल सामना खेळत आहे. आयपीएलचा अंतिम सामना मुंबई विरुद्ध पुणे असा रंगणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज