अ‍ॅपशहर

रोहितने ड्रेसिंग रुममध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची घेतली शाळा; सलग ३ पराभवानंतर काय म्हणाला हिटमॅन

Rohit Sharma speech: पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला स्लो स्टार्टर म्हटले जाते. एकदा का मुंबईची गाडी सुरू झाली की मग त्यांना थांबवणे अशक्य होते. पाहा सलग ३ पराभवानंतर रोहित काय म्हणाला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2022, 4:46 pm
मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)च्या खराब कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ने कोणत्याही खेळाडूला दोषी ठरवले नाही. आयपीएलमध्ये मुंबईचा सलग ३ सामन्यात पराभव झालाय. त्यानंतर संघातील सहकाऱ्यांसोबत बोलताना रोहितने फक्त एक गोष्ट सांगितली. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडिन्सचा या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने पराभव केलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रोहित शर्मा
rohit sharma speech


केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर रोहितने ड्रेसिंग रुममध्ये सर्व खेळाडूंसोबत चर्चा केली. रोहितने कोणालाही दोषी ठरवले नाही तर फक्त पुढील सामन्यात विजयासाठी उत्सुकता आणि विजयाची भूख दाखवण्यास सांगितले. रोहित म्हणाला, आम्ही इथे कोणत्याही एका खेळाडूला दोषी ठरवू शकत नाही. आपण सर्वजण यात सहभागी आहोत. आपण सर्वजण एकत्र जिंकतो आणि एकत्र पराभूत होतो. मला वाटते की ही गोष्ट इतकी सोपी आहे.

मला वाटते की प्रत्येकामध्ये थोडीशी उत्सुकता हवी आहे. जेव्हा आपण खेळतो. विशेषत: या लीगमध्ये तेव्हा ही गोष्ट फार महत्त्वाची होते. कारण प्रतिस्पर्धी संघ वेगवेगळ्या असतात. ते वेगवेगळ्या गेम प्लॉनने येत असतात. आपल्याला नेहमी त्यांच्या पुढे होण्याची गरज आहे. नेहमी त्याच्यावर आक्रमकपणे हल्ला चढवावा लागले, असे रोहित म्हणाला.


रोहितने सर्व खेळाडूंना आव्हान कराना हे देखील सांगितले की, विजयासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो जी मैदानावर त्यासाठी थोडी भूक आणि उत्सुकता दाखवावी लागले. रोहितने हे देखील म्हटले की, घाबरण्याची गरज नाही. यामुळे कोणतेही अंतर निर्माण होणार नाही.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख