अ‍ॅपशहर

मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय, १६ खेळाडूंना संघात कायम ठेवले, जाणून घ्या संपूर्ण यादी...

IPL 2023 : मुंबई इंडिन्सच्या संघाने आता ज्या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे, त्यांची यादी आता जाहीर केली आहे. मुंबईने यावेळी १६ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे, तर काही खेळाडूंना त्यांनी रिलीज केले आहे. मुंबईने आता कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे आणि हे खेळाडू नेमके आहेत तरी कोण, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 15 Nov 2022, 7:38 pm
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघाने आता आयपीएलसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने IPL 2023 या पुढच्या हंगामासाठी आता १६ खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. या १६ खेळाडूंमध्ये नेमकी कोणाला संधी मिळाली आहे, याचे अपडेट्स आता समोर आले आहेत.
View this post on Instagram A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)
मुंबई इंडियन्सच्या संघात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. कायरन पोलार्डने आज आज आपली निवृत्ती जाही केली. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने ज्या खेळाडूंना संघात कायम ठेवले नाही त्यांची यादी यावेळी जाहीर केली, तर ज्या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे त्यांचीही नावं यावेळी सर्वांसमोर आणली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Indians
सौजन्य-ट्विटर


मुंबई इंडियन्सने संघात कायम ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मढवाल (Rohit Sharma (captain), Tim David, Ramandeep Singh, Tilak Varma, Suryakumar Yadav, Ishan Kishan, Tristan Stubbs, Dewald Brevis, Jofra Archer, Jasprit Bumrah, Arjun Tendulkar, Arshad Khan, Kumar Kartikeya, Hrithik Shokeen, Jason Behrendorff, Akash Madhwal).

पोलार्ड आता या मुंबई इंडियन्सच्या संघात नसला तरी तो फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करेल. मुंबई इंडिन्सचे अजून दोन संघ या क्रिकेट विश्वात आहेत, यामधील एक संघ हा MI Emirates आहे. त्यामुळे आता पोलार्ड हा आयपीएल खेळणार नसला तरी तो या संघाकडून खेळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलार्ड आता खेळणारच नाही, या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही. कारण तो एक खेळाडू म्हणून आता मुंबई इंडियन्सबरोबर कायम राहणार आहे. यापूर्वी पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार होता. जेव्हा जेव्हा रोहित शर्मा संघाबाहेर गेला तेव्हा पोलार्डने समर्थपणे मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व केले होते. पण आता तो आयपीएलमध्ये खेळणार नाही. पण त्याला आता MI Emirates संघात खेळताना चाहते पाहू शकतात. पण पोलार्ड आता खेळाडू म्हणून खेळणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख