चेन्नई:
सलामीवीर शेन वॉटसनच्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने हैदराबादवर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या या हंगामातील प्ले-ऑफ फेरीत प्रवेश केला आहे.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत १७५ धावा केल्या. हैदराबादने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. फाफ डु प्लेसिस अवघ्या एका धावेवर धावबाद झाला. सलामीवीर शेन वॉटसनच्या आक्रमक फलंदाजीमुळे ५३ चेंडूत ९६ धावा करण्यात त्याला यश मिळाले. वॉटसन बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे २१ आणि ३८ धावा करत डाव सावरला.
सनराईजर्स हैदराबाद संघाने मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १७५ धावांचा टप्पा गाठला. मात्र, त्याचा फारसा फायदा संघाला झाला नाही.