अ‍ॅपशहर

IPL: चेन्नई वि. कोलकाता सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2019, 11:36 pm
चेन्नईः
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl


आयपीएल स्पर्धेतील सामने पुढे जात आहेत, तशी त्यातील रंगत वाढत आहे. आयपीएलमध्ये आज चेन्नई वि. कोलकाता सामना होणार आहे. मागील सामन्यात आपापले सामने जिंकल्यामुळे दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मात्र, रसेल वादळ रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान असणार आहे. धोनी ब्रिगेड हे आव्हान कसे रोखते, या सामन्यात कोणाचा पगडा भारी होतो आणि कोण अंतिम बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाहुया या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स..

LIVE: चेन्नई वि. कोलकाता सामना

> चेन्नईचा कोलकातावर ७ गडी राखून विजय

> चेन्नईला तिसरा धक्का; अंबाती रायुडू २१ धावांवर झेलबाद

> चेन्नईला दुसरा धक्का; सुरेश रैना १४ धावांवर झेलबाद

> चेन्नईला पहिला धक्का; शेन वॉटसन १७ धावांवर बाद

> २ षटकांनंतर चेन्नईच्या बिनबाद १४ धावा

> कोलकाताचे चेन्नईसमोर विजयासाठी १०९ धावांचे आव्हान

> कोलकाताचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलचे ४४ चेंडूत अर्धशतक पूर्ण

> १७ षटकांनंतर कोलकाताच्या ९ गडी बाद ७९ धावा

> कोलकाताला नववा धक्का; क्रिश्ना शून्यावर बाद

> कोलकाताला आठवा धक्का; कुलदीप यादव शून्यावर धावचीत

> कोलकाताला सातवा धक्का; पियुष चावला ८ धावांवर यष्टीचीत

> १३ षटकांनंतर कोलकाताच्या ६ गडी बाद ६३ धावा

> कोलकाताला सहावा धक्का; शुभमन गिल ९ धावा काढून बाद

> कोलकाताला पाचवा धक्का; कर्णधार कार्तिक १९ धावा काढून माघारी

> ५ षटकांनंतर कोलकाताच्या ४ गडी बाद २४ धावा

> कोलकाताला चौथा धक्का; रॉबिन उथप्पा ११ धावांवर झेलबाद

> कोलकाताला तिसरा धक्का; नितीश राणा शून्यावर बाद

> कोलकाताला दुसरा धक्का; सुनील नारायण ६ धावांवर झेलबाद

> पहिल्या षटकानंतर कोलकाताच्या १ गडी बाद ६ धावा

> कोलकाताला पहिला धक्का; ख्रिस लीन शून्यावर बाद

> नाणेफेक जिंकून चेन्नईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

> चेन्नई वि. कोलकाता: थोड्याच वेळात नाणेफेक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज