अ‍ॅपशहर

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच वाद... इंग्लंडने स्टार खेळाडूला खेळण्याची परवानगीच नाकारली

IPL 2023 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच आता मोठा वाद होऊ शकतो, असे दिसत आहे. कारण इंग्लंडने एका खेळाडूला आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे, तर स्टार खेळाडूला नाही. त्यामुळे यावर आता मोठा वाद होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आयपीएल सुरु होण्यापूर्वी ही समस्या सुटणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 Mar 2023, 8:30 pm
नवी दिल्ली : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच आता एक अजब गोष्ट समोर आली आहे. कारण इंग्लंडच्या संघाने आता आपल्या स्टार खेळाडूला आयपीएल खेळण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता आयपीएल सुरु होण्यापूर्वी वाद सुरु होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl 2023


आयपीएलमध्ये जर परदेशी खेळाडूंना खेळायचे असेल तर त्यांना आपल्या क्रिकेट मंडळाकडून ना हरकत प्रमाणपण घ्यावे लागते. हे प्रमाणपत्र जर क्रिकेट मंडळाने दिले नाही तर त्या खेळाडूला आयपीएल खेळता येणार नाही. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आता हीच गोष्ट केली आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी या खेळाडूवर ६.७५ कोटींची बोली लावण्यात आली होती. पण आता इंग्लंडच्या मंडळाने आपला स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टोला ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे आता ता आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, असे समोर येत आहे. पण इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आता लायम लिव्हिंगस्टोनला मात्र आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

बेअरस्टोह हा इंग्लंडसाठी महत्वाचा खेळाडू आहे. कारण जॉनीने आतापर्यंत इंग्लंडला बरेच सामने जिंकवून दिले आहेत. पण जॉनीला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. गोल्फ कोर्सवर जॉनी हा पाय घसरून पडला होता आणि त्याला फ्रॅक्चर झाले होते. या दुखापतीमुळे त्याला टी-२० विश्वचषक खेळता आला नव्हता. त्याबरोबर त्याला पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यांतही सहभागी होता आले नव्हते. आता जॉनीला क्रिकेट मंडळाने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे तो आता आयपीएलली खेळू शकणार नाही. एकिकडे इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने लिव्हिंगस्टोनला परवानगी दिली आणि दुसरीकडे त्यांनी जॉनीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आयपीएलपूर्वी हा वाद मोठा होऊ शकतो. कारण हे दोन्ही खेळाडू पंजाब किंग्सच्या संघात आहे. त्यामुळे एका खेळाडूला परवानगी दिली जात असेल तर दुसऱ्याला का नाही, असा सवाल पंजाबचा संघ विचारू शकतो आणि वादाला तोंड फुटू शकते. त्यामुळे आता आयपीएलमध्ये या गोष्टीचे पुढे काय होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने सर्वच खेळाडूंना परवानगी द्यावी किंवा सर्वांनाच सरसकट देऊ नये, अशी भावना चाहत्यांच्या मनात आहे. त्यामुळे यावर इंग्लंडचे क्रिकेट मंडळ काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचचे लक्ष असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख