अ‍ॅपशहर

आयपीएल: मी तर 'किंग' आहे: ख्रिस गेल

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल सध्या जबरदस्त फार्मात आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये त्यानं १५१ च्या सरासरीनं २५२ धावा कुटल्या आहेत. त्यात एका नाबाद शतकाचा समावेश आहे. पंजाबकडून खेळत असल्यानं खूप खूश आहे. या संघातून खेळणं नशिबात होतं कारण मी किंग आहे, असं गेलनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

Aditya Bhattacharya | टाइम्स न्यूज नेटवर्क 30 Apr 2018, 3:11 pm
गोवा:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gayle

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल सध्या जबरदस्त फार्मात आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांमध्ये त्यानं १५१ च्या सरासरीनं २५२ धावा कुटल्या आहेत. त्यात एका नाबाद शतकाचा समावेश आहे. पंजाबकडून खेळत असल्यानं खूप खूश आहे. या संघातून खेळणं नशिबात होतं कारण मी किंग आहे, असं गेलनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

आयपीएलसाठी झालेल्या लिलावात सुरुवातीला गेलला कोणत्याच संघानं खरेदी केलं नाही. बेंगळुरू संघानं त्याला रिटेन केलं नाही. खरं तर २०१७ हे वर्ष गेलसाठी चांगलं नव्हतं. त्यामुळं त्याला लिलावात खरेदी करण्याची कुणीही 'रिस्क' घेतली नाही. याचं गेलला आश्चर्य वाटलं. मात्र, नंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबनं २ कोटी रुपयांना खरेदी केलं.

बेंगळुरू संघानं अविश्वास दाखवला

कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर बेंगळुरू संघ व्यवस्थापनाकडून फोन आला होता. संघात परत घेऊ असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्याकडून कधीच फोन आला नाही. त्यावेळी बेंगळुरू संघ आपल्याला संघात घेणार नाही, याची खात्री पटली होती. पण मी त्यासाठी कुणाशीही भांडू शकत नाही. मी बीपीएल आणि सीपीएल या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. आयपीएलबाबत म्हणाल तर, २१ अर्धशतके, सर्वाधिक षटकारांचा विक्रम माझ्या नावावर आहे, असं गेलनं सांगितलं.

ही दोन स्वप्ने पूर्ण करायची आहेत!

यावर्षी पंजाब संघाला आयपीएलचं जेतेपद मिळवून द्यायचं आहे. तसंच पुढील वर्षी वेस्ट इंडिज संघाला वर्ल्डकप जिंकून द्यायचा आहे, असं गेलनं सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज