अ‍ॅपशहर

Gujarat vs Mumbai Live Score, IPL 2022: गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स लाईव्ह अपडेट

IPL 2022, GT vs Mi Live Score and Cricket Match Update: आयपीएल २०२२ हंगामातील ५१ वा सामना आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमध्ये एन्ट्री करण्यासाठी गुजरातचा संघ आतुर झाला आहे. दुसरीकडे, आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडलेला मुंबई इंडियन्सचा संघ आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मैदानात उतरला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2022, 9:31 pm
मुंबई : आयपीएल २०२२ हंगामातील ५१ वा सामना आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होत आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफमध्ये एन्ट्री करण्यासाठी गुजरातचा संघ आतुर झाला आहे. दुसरीकडे, आधीच प्ले ऑफमधून बाहेर पडलेला मुंबई इंडियन्सचा संघ आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मैदानात उतरला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध आठ गडी राखून पराभव पत्करावा लागल्यानंतर, गुजरात टायटन्स पुनरागमन करण्यासाठी आतुर आहेत. तर पॉइंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर असणाऱ्या मुंबईच्या संघाला सलग ८ पराभवांचे धक्के बसले आहेत. या हंगामात मुंबईला केवळ एक विजय मिळवता आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम GT vs MI Live Score IPL 2022 Match 51 Gujarat Titans vs Mumbai Indians Playing 11 Highlights pitch Cricket Update
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या


<< मुंबईच्या निर्धारित २० षटकांमध्ये ६ बाद १७७ धावा

<< तिलक वर्मा १६ चेंडूत २१ धावा करुन बाद

<< मुंबईला आणखी एक धक्का, केरॉन पोलार्ड ४ धावांवर बाद

<< इशान किशान बाद, २९ चेंडूत ४५ धावा फटकावल्या

<< मुंबईला दुसरा मोठा धक्का, सूर्यकुमार यादव १३ धावांवर बाद

<< मुंबई मोठा धक्का, रोहित शर्मा २८ चेंडूत ४३ धावा करुन रोहित बाद

<< पहिल्या पॉवरप्लेमध्ये मुंबईच्या ६३ धावा

<< पहिल्या ५ ओव्हरमध्ये मुंबईच्या ५० धावा


<< मुंबई इंडियन्सचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, रिले मेरेडिथ

<< गुजरात टायटन्सचा संघ: वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (क), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, साई सुदर्शन, राशिद खान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, प्रदीप संगवान आणि मोहम्मद शमी.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज