अ‍ॅपशहर

IPL 2020: तारीख जाहीर, पहिली लढत मुंबईत!

टी-२० लीगमधील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या आयपीएलच्या १३व्या (IPL 2020) हंगामाची तारीख जाहीर झाली आहे. IPL २०२०चा पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2020, 12:19 pm
नवी दिल्ली: टी-२० लीगमधील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या आयपीएलच्या १३व्या (IPL 2020) हंगामाची तारीख जाहीर झाली आहे. IPL २०२०चा पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील विद्यमान विजेता मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) संघ घरच्या मैदानावरून स्पर्धेला सुरुवात करेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ipl 2020


दिल्ली कॅपिटल्सच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमधील सामन्यांची सुरुवात २९ मार्च पासून होईल. संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, मला दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२०चे सामने २९ मार्च रोजी सुरु होतील आणि पहिला सामना २९ मार्च रोजी होईल. याचा अर्थ आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचे काही खेळाडू उपलब्ध असणार नाहीत.

वाचा-कसोटीत सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज!

कारण याच काळात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका होणार आहे. तर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या दोन्ही मालिका ३१ मार्च रोजी संपतील. त्यानंतरच संबंधित देशांचे खेळाडू IPLसाठी उपलब्ध होतील. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका २९ मार्च रोजी तर लंका आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका ३१ तारखेला संपणार आहे.

वाचा- २०१९मधील सर्वाधिक विकेट घेणारे ५ गोलंदाज

आयपीएलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गव्हर्निंग कौन्सिलला पुन्हा एकदा जुन्या पद्धतीने सामने घेण्याची विनंती केली आहे. जुन्या पद्धतीमध्ये आयपीएलची सुरुवात १ एप्रिल रोजी होते आणि प्रत्येक दिवशी दोन सामने खेळवले जातात. या पद्धतीमुळे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात मिळतात असे अनेक संघांचे मत आहे.

हे देखील वाचा-
ICC कसोटीमधील १४२ वर्ष जुना नियम बदलणार!
Viral Video: दिव्यांग मुलाचा क्रिकेट शॉट!
सर्वोत्तम टी-२० संघात रोहित, धोनीला स्थान नाही!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज