अ‍ॅपशहर

IPL 2021: धोनीची चेन्नई एक्स्प्रेस सुस्साट, फक्त गुणतक्यात नाही तर...

आयपीएलच्या १४व्या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग पाच विजय मिळवत गुणतक्त्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नईने फक्त पहिले स्थान मिळवले नाही तर..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2021, 12:56 pm
नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात सातव्या क्रमांकावर राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्ज या वर्षी सुस्साट सुटली आहे. काल बुधवारी झालेल्या सामन्यात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने सनरायझर्सचा ७ विकेटनी पराभव केला आणि गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम चेन्नईचे खेळाडू (फोटो-बीसीसीआय)


वाचा- विजय मिळवण्याचा एकच मार्ग आहे मुंबई इंडियन्सकडे, आज राजस्थान विरुद्ध

आयपीएल २०२१ मध्ये चेन्नईचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या लढतीत पराभव झाला होता. त्यानंतर मात्र चेन्नईच्या संघाने सलग ५ विजय मिळवले आहेत. १० गुणांसह चेन्नई अव्वल स्थानावर असला तरी आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्यांची सरासरी होय. अन्य कोणत्याही संघापेक्षा सर्वाधिक सरासरी चेन्नई सुपर किंग्जची आहे.

वाचा-IPL 2021: 'मुंबई इंडियन्सचे काही खर वाटत नाही, त्यांच्याबद्दल काळजी वाटते'

चेन्नईची सरासरी प्लस १.४७५ इतकी असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्सपेक्षा (प्लस ०.०८९) त्यांची सरासरी ही किती तरी पट अधिक आहे. या दोन्ही संघांनी पाच विजयासह १० गुण मिळवले आहेत. पण सरासरीच्या बाबतीत चेन्नई फार पुढे आहे.


गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली कॅपिटल्स असून त्यांनी ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्स दोन विजयासह चौथ्या क्रमांकावर आहेत. कोलकाता पाचव्या, पंजाब किंग्ज सहाव्या तर राजस्थान रॉयल्स सातव्या आणि सहा पैकी पाच पराभवासह हैदराबाद आठव्या स्थानावर आहे.



सर्वाधिक धाव करणारे फलंदाज


फाफ डु प्लेसिस- २७० धावा
शिखर धवन- २६५ धावा
ग्लेम मॅक्सवेल- २२३

सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज


हर्षल पटेल- १७ विकेट
आवेश खान -१२
राशिद खान- ९

महत्वाचे लेख