अ‍ॅपशहर

IPL 2021 : पृथ्वी शॉबाबत प्रवीण अमरे यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...

पृथ्वी शॉची वाईट सवय काय आहे, हे दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी सोमवारी सांगितले होते. त्यानंतर संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनीही पृथ्वाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. पृथ्वीबाबत प्रवीण अमरे नेमकं काय म्हणाले, पाहा...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 7 Apr 2021, 10:14 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prithvi
मुंबई : पृथ्वी शॉबाबत आता अजून एक मोठा खुलासा समोर आला आहे. सोमवारी पृथ्वीच्या वाईट सवयीबाबत दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने एक खुला केला होता. त्यानंतर आता दिल्लीच्या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. पृथ्वीबाबत सलग दोन दिवसांमध्ये या दोन गोष्टी ऐकायला मिळाल्या आहेत.

पॉन्टिंगने पृथ्वीच्या वाईट सवयीबाबत नेमकं काय सांगितलं होतं, पाहा...
पॉन्टिंग यावेळी म्हणाला की, " पृथ्वीची बॅटिंग करण्याची थिअरी नेमकी काय आहे, हेच कळत नाही. जेव्हा पृथ्वीकडून धावा होत नसतात तेव्हा तो फलंदाजीचा सरावच करत नाही. पण जेव्हा त्याच्याकडून चांगल्या धावा होत असतात तेव्हा तो सर्वाधिक काळ फलंदाजीचा सराव करत असतो. पण जेव्हा धावा होत नसतात, तेव्हा फलंदाजीचा सराव न करणे, ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे पृथ्वीने त्याची ही सवय बदलायला हवी."

प्रवीण अमरे यांनी पृथ्वीबाबत कोणता मोठा खुलासा केला, पाहा...

पृथ्वीबाबत प्रवीण अमरे यावेळी म्हणाले की, " सध्याच्या घडीला पृथ्वीमध्ये चांगला आत्मविश्वास दिसत आहे आणि आमच्यासाठी ते महत्वाचे आहेत. पृथ्वी सध्याच्या घडीला नेट्समध्ये सर्वाधिक काळ व्यतित करत आहे. पृथ्वी आता सर्वात पहिल्यांदा दुपारी तीन वाजता नेट्समध्ये येतो आणि अधिकाधिक चेंडूंचा सामना करण्यावर त्याचा भर असतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने फक्त आठ सामन्यांमध्ये ८००पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. हा फरक आता पृथ्वीमध्ये पाहायला मिळाला आहे. त्याचा हा फॉर्म असाच कायम राहीला तर त्याचा संघाला निश्चितच फायदा होणार आहे."

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने गेल्यावर्षी पृथ्वीला संघाबाहेर काढले होते. आयपीएलच्या अंतिम फेरीत दिल्लीचा संघ पोहोचला असला तरी पृथ्वीला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर भारतीय संघाकडूनही पृथ्वीला डच्चू देण्यात आला आणि सध्याच्या घडीला तो भारतीय संघातही नाही. पण आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. आता त्याच्या या फॉर्मचा फायदा दिल्लीच्या संघाला कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज