अ‍ॅपशहर

Delhi Capitals corona virus case: दिल्ली कॅपिटल्सचा संघ करोनाच्या विळख्यात; IPLचा पुढील सामना संकटात

Delhi Capitals corona virus case: आयपीएल २०२२च्या बायो बबलमध्ये करोनाने शिरकाव केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील फिजिओ पाठोपाठ आता एका खेळाडूला करोनाची लागण झाली आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2022, 1:04 pm
मुंबई: आयपीएलच्या १५व्या हंगामात करोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता संघातील एका खेळाडूची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दिल्ली कॅपिटल्स
delhi capitals corona virus


वाचा- मुंबई इंडियन्स आता हा रेकॉर्ड करू नका; रोहित आणि कंपनीची वाटचाल लाजिरवाण्या विक्रमाकडे

ज्या खेळाडूला करोनाची लागण झाली आहे त्याचे नाव अद्याप समोर आले नाही. पण रॅपिड टेस्टमध्ये या खेळाडूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. दिल्ली संघाची पुढील मॅच २० एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. दिल्लीचा संघ आज सोमवारी मुंबईतून पुण्यासाठी जवाना होणार होता. पण आता हा प्रवास स्थगित करण्यात आला आहे. संपूर्ण संघ हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाला आहे. सर्व खेळाडूंची दोन दिवस करोना टेस्ट घेतली जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान ताज्या वृत्तानुसार सपोर्ट स्टाफमधील अन्य एका व्यक्तीला करोनाची लक्षणे जाणवत आहेत. पण त्याच्या चाचणीचा रिपोट अद्याप आलेला नाही.

वाचा- चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यास गेलेल्या १८ वर्षीय खेळाडूचा अपघाती मृत्यू

करोनामुळे आयपीएलचा गेला हंगाम स्थगित करण्याची वेळ आली होती. ४ मे २०२१ रोजी आयपीएल २०२२चा हंगाम स्थगित करण्यात आला होता. तेव्हा सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धा स्थगित झाली तेव्हा फक्त २९ लढती झाल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईमध्ये सहा महिन्यांनी आयोजित केला. करोनामुळे आयपीएल २०२०चे आयोजन देखील युएईमध्ये करण्यात आले होते. दिल्ली संघात करोनाचा प्रवेश झाल्याने बीसीसीआयने दिल्ली संघाला सामना झाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगितले होते.

वाचा- IPL २०२२ मध्ये टाकला सर्वात धोकादायक यॉर्कर; फलंदाजाची बॅट तुटली

करोनाचा क्रिकेटवर जास्त प्रभाव पडला आहे. आता आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात करोनाचा शिरकाव झाल्याने पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती. तेव्हा न झालेली कसोटी आता जुलै २०२२ मध्ये होणार आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख