अ‍ॅपशहर

IPL 2023: धोनीचे IPL २०१८मधील विजेतेपद सर्वोत्तम; सुनिल गावस्करांनी सांगितले नेमकं कारण

MS Dhoni Captaincy: आयपीएल २०२३चा हंगाम काही दिवसांंवर आला आहे. या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघात होणार आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2023, 3:53 pm
नव्वी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्ज हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नईला हा किताब मिळवून देण्यात संघाचा कर्णधार एम.एस धोनीचा मोठा वाटा आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. चेन्नईने शेवटचे २०२१ साली आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. मात्र संघाने २०२८ साली जिंकलेला आयपीएलचा हंगाम सर्वात खास असल्याचं मानला जातं. कारण २ वर्षांच्या बंदीनंतर संघाने स्पर्धेत पुनरागमन केले आणि हंगाम जिंकून त्यांना आयपीएलचा सर्वोत्तम संघ का म्हटले जाते हे सिध्द केले. अशातच भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी चेन्नई २०१८ साली मिळवलेला विजय खास असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच त्यांनी धोनीच्या नेतृत्वाचही भरभरून कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sunil Gavaskar MS Dhoni


धोनीच्या नेतृत्वाने प्रभावित

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी धोनीच्या नेतृत्वाचं भरभरून कौतूक केलं आहे. गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितलं की "मला असे वाटत की सीएसकेने जेव्हा पुनरागमन करून करंडक जिंकला तो हंगाम खूप महत्त्वाचा होता. कराण संघ दोन वर्ष एकत्र नव्हता आणि खेळाडू वेगवेगळ्या संघासोबत खेळत होता. अशात त्यांनी २०१८ साली पुनरागमन केलं आणि विजय मिळवला. यावरून तुमची नेतृत्व क्षमता कळते".

इसी वाँगने इतिहास घडवला, WPLमध्ये पहिल्या हॅटट्रिकची नोंद; मुंबई इंडियन्सची फायनलमध्ये धडक
३१ मार्चला होणार आयपीएल २०२३ ची सुरुवात

पाकिस्तानने राहिलेली इज्जत देखील घालवली; ९२ धावांवर ऑलआउट, पाहा कोणाविरुद्ध हारले

आयपीएल २०२३च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. तर आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा पहिला सामना हा गत विजेता गुजरात जायंट्स आणि ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर जायंट्समध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल २०२३चा पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम मध्ये शुक्रवारी खेळला जाणार आहे. त्यामुळ सध्या सगळे खेळाडू हे त्यांच्या त्यांत्या संघासोबत आयपीएलची त्यारी करताना बघायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे धोनी यंदा शेवटच आयपीएल खेळणार असल्यी चर्चा केली जात आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख