अ‍ॅपशहर

IPL: युसूफ पठाणनं स्वीकारलं भावाचं 'हे' आव्हान

अष्टपैलू खेळाडू लोकेश राहुलनं आयपीएल सामन्यात सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. इरफान पठाण यानं याबद्दल राहुलचं अभिनंदन करतानाच त्याचा भाऊ युसूफ पठाणला फाटेस्ट फिफ्टीचं चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे, युसूफनं हे आव्हान स्वीकारलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2018, 1:08 pm
नवी दिल्ली: अष्टपैलू खेळाडू लोकेश राहुलनं आयपीएल सामन्यात सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. इरफान पठाण यानं याबद्दल राहुलचं अभिनंदन करतानाच त्याचा भाऊ युसूफ पठाणला फाटेस्ट फिफ्टीचं चॅलेंज दिलं आहे. विशेष म्हणजे, युसूफनं हे आव्हान स्वीकारलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम irfan pathan gives challenge to yusuf pathan after kl rahul fastest fifty
IPL: युसूफ पठाणनं स्वीकारलं भावाचं 'हे' आव्हान


आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या लोकेश राहुलनं एका सामन्यात जोरदार फटकेबाजी करत अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. कमी चेंडूत ५० धावा ठोकण्याचा विक्रम राहुलनं प्रस्थापित केला. याआधी २०१४ मध्ये युसूफ पठाणने कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना १५ चेंडूत अर्धशतक ठोकले होते.


राहुलच्या विक्रमी अर्धशतकी खेळीनंतर इरफान पठाणनं ट्विट करून लोकेश राहुलचं कौतुक केलं. 'राहुल, जबरदस्त खेळलास. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलंस. युसूफ भाई, आता तू १३ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा प्रयत्न करशील का?,' असं ट्विट इरफाननं केलं आहे.

त्याला उत्तर देताना युसूफनं इरफानचं हे आव्हान स्वीकारलं आहे. 'तुझ्यासाठी १३ चेंडूत ५० धावा ठोकण्याचा प्रयत्न करेन. भाई, तुला कॉमेन्ट्री करताना ऐकणं खूप बरं वाटतं. तू लवकरच नव्या भूमिकेत दिसशील अशी आशा आहे. आणि हो, राहुलनं खूपच चांगली फलंदाजी केलीय,' असं युसूफनं म्हटलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज