अ‍ॅपशहर

KKR v SRH Preview : केकेआरचा संघ आयपीएलमध्ये कसे पटकावणार अव्वल स्थान, जाणून घ्या समीकरण...

केकेारचा संघ भन्नाट फॉर्मात आहे. त्यामुळे केकेआरच्या संघाला आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी असेल. केकेआरचा आजचा सामना हा सनरायझर्स हैदराबरोबर दोन हात करणार आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून केकेआराच संघ गुणतालिकेत कसा जाऊ शकतो, याचे समीकरणही आता समोर आले आहे. हे समीकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 15 Apr 2022, 6:09 pm
मुंबई : केकेआरच्या संघाने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावरही पोहोचू शकतो, याबाबतचे समीकरणही आता पुढे आले आहे. आज केकेआरचा सनरायझर्सचा सामना केकेआरबरोबर होत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवल्यावर केकेआरचा संघ अव्वल स्थानावर जाऊ शकतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम श्रेयस अय्यर (सौजन्य-केकेआर ट्विटर)

केकेआरचा संघ कसा अव्वल होऊ शकतो, जाणून घ्या समीकरण...
सध्याच्या घडीला केकेआरचा संघ हा गुणतालिकेत सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर त्यांचा रनरेटही चांगला आहे. त्यामुळे आजचा सामना जर केकेआरच्या संघाने जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर जाण्याची नामी संधी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत केकेआरचा संघ गुजरात टायटन्सला धक्का देत अव्वल स्थानावर जाऊ शकतो. दुसरीकडे हैदराबादने दोन विजय मिळवले असून त्यांच्या खात्यात चार गुण आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून त्यांना सहा गुण कमावण्याची संधी आहे.
केकेआरच्या संघात मोठे बदल...
आजच्या सामन्यासाठी केकेआरच्या संघात दोन मोठे बदल होऊ शकतात, असे आता दिसत आहे. अजिंक्य रहाणेच्या जागी आरोन फिंचला संधी देण्यात येऊ शकते. त्याचबरोबर रिंकू सिंगला आजच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते. हैदराबादचा संघ सध्याच्या घडीला विजयाच्या लाटेवर स्वार झाला आहे. त्यामुळे केकेआरविरुद्धच्या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघात कोणतेही मोठे बदल होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
खेळपट्टी
केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. ब्रेबॉर्नची खेळपट्टी ही फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी पोषक आहे. त्यामुळे या सामन्यात १८० च्या पुढे जो संघ धावा करेल, त्यांना विजयाची संधी जास्त असेल.
नाणेफेकआयपीएलमध्ये नाणेफेकीचा कौल महत्वाचा असतो. या सामन्यात खेळपट्टी पाहता जो संघ नाणेफेक जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्राधान्य देईल. त्यामुळे आज जो संघ नाणेफेक जिंकेल तो धावांचा पाठलाग करण्यासाठीच सर्वात जास्त प्राधान्य देईल, असे दिसत आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख