अ‍ॅपशहर

मेगा ऑक्शनसाठी या संघाने प्लॉन सुरू; मास्टर माइड खेळाडू पोहोचला

IPL 2022 : १२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल २०२२ साठीचा मेगा लिलाव होणार आहे. याच्या नियोजनासाठी धोनी फ्रँचायझीसोबत सामील होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 28 Jan 2022, 2:24 pm
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामाच्या (IPL Mega Auction 2022) मेगा लिलावाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. सीएसकेचा (CSK) कर्णधार गुरुवारी (२७ जानेवारी) चेन्नईतील एका हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याचे फोटो सगळीकडे व्हायरल होऊ लागले आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या तयारीत धोनीचा सहभाग असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम धोनी चेन्नईत दाखल


वाचा- IPL 2022साठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; सर्व सामने या शहरात होणार

चेन्नई फ्रँचायझीने त्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली या चार खेळाडूंना कायम ठेवले आहे. जडेजाला १६ कोटी, तर धोनीला १२ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. अलीला ८ कोटी रुपये, तर गायकवाडला ६ कोटी रुपयांसह करारबद्ध करण्यात आले आहे.

वाचा- युवा खेळाडूंना 'चुना' लावणारी निवड समिती; देवदत्त, ऋतुराज आणि आता वेंकटेशची झाली फसवणूक


गतविजेत्या सीएसकेकडे चांगला संघ बनवण्यासाठी मेगा लिलावात ५८ कोटी रुपये शिल्लक आहेत. आयपीएलमधून निवृत्त होणार का या चर्चांना धोनीने पूर्णविराम दिला होता. चेन्नईसाठी खेळणे सुरू ठेवायचे आहे आणि माझा शेवटचा सामना चेन्नईमध्ये होईल, असे खुद्द धोनीने चेन्नईतील एका कार्यक्रमात सांगितले होते.

वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित शर्मा इतिहास घडवणार; या दिग्गज खेळाडूला मागे...

दरम्यान, गेल्या मोसमात आयपीएल लिलावांबाबत धोनी विस्तृतपणे बोलला होता आणि सीएसकेला किमान पुढील ५-१० वर्षे खेळणारा संघ बनवण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले होते. धोनी म्हणाला होता की, सीएसकेसाठी खेळणे ही फक्त माझ्याबद्दलची गोष्ट नाही, तर सीएसकेसाठी सर्वोत्तम काय आहे हे महत्वाचे आहे. संघासाठी पुढील १० वर्षांत कोण योगदान देऊ शकेल, हे पाहावे लागेल, त्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

महत्वाचे लेख