अ‍ॅपशहर

Mumbai vs Chennai Highlights : पोलार्डचा लुंगी डान्स, ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा; मुंबईचा CSKवर दिमाखदार विजय

IPL 2021 Mumbai Indians vs Chennai Super Kings: दिल्लीतील अरुण जेठली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्से चेन्नई सुपर किंग्जवर चार विकेटनी विजय मिळवला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2021, 11:56 pm
नवी दिल्ली: आयपीएल २०२१मध्ये २७वी साखळी लढत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा ४ विकेटनी पराभव केला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २१८ धावा केल्या होत्या. विजयाचे लक्ष्य चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पार केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई आणि चेन्नई


मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज Live अपडेट




वाचा- IPL 2021 MI vs CSK: पोलार्डच्या वादळापुढे चेन्नई भुईसपाट, मुंबईचा थरारक विजय

>> पोलार्डची वादळी खेळी ३४ चेंडूत नाबाद ८७ धावा

>> मुंबईचा ४ विकेटनी विजय

>> अखेरच्या चेंडूवर मुंबईला हव्यात २ धावा

>> अखेरच्या षटकात मुंबईला हव्यात १६ धावा

>> कारयन पोलार्डचे १७ चेंडूत अर्धशतक

>> डी कॉक ३८ धावांवर बाद, मुंबई ३ बाद ८१

>> मोइन अलीने घेतली डी कॉकची विकेट

>> सूर्यकुमार यादव ३ वर बाद, मुंबई २ बाद ७७

>> जडेजाने घेतली मोठी विकेट, सूर्यकुमार यादव बाद

>> रोहित शर्मा ३५ वर बाद, मुंबई १ बाद ७१

>>मुंबईला पहिला धक्का, शार्दुलने घेतली रोहित शर्माची विकेट

>> पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या ५८ धावा

>> रोहित शर्मा आणि क्विटंन डी कॉक यांनी केली मुंबईच्या डावाची सुरूवात



>> वाचा- MI vs CSK: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई; चेन्नईने दिले डोंगराएवढे आव्हान

>> २० षटकात चेन्नईच्या ४ बाद २१८ धावा

>> अंबाती रायडूचा धमाका, २० चेंडूत अर्धशतक

>> चेन्नईची दाणादाण उडाली, १ बाद १११ वरू ४ बाद ११८

>> रैना २ धावांवर बाद, पोलार्डने सलग दोन विकेट घेतल्या

>> फाफला पोलार्डने ५० धावांवर बाद केले

>> फाफ डुप्लेसीसचे अर्धशतक, २७ चेंडूत ५० धावा

>> मोइन अलीच्या ३६ चेंडूत ५८ धावा, चेन्नई २ बाद ११२

>> जसप्रीत बुमराहने घेतली मोइन अलीची विकेट

>> मोइन अलीचा धमाका, ३३ चेंडूत ५० धावा

>> पॉवर प्लेअरमध्ये चेन्नईच्या १ बाद ४९ धावा

>> ऋतुराज गायकवाड ४ धावांवर बाद, चेन्नई १ बाद ४

>> पहिल्याच षटकात बोल्टने घेतली चेन्नईची पहिली विकेट

>> ऋतुराज-फाफ यांनी केली चेन्नईच्या डावाची सुरूवात

>> वाचा- IPL 2021: चेन्नईचा पराभव करण्यासाठी रोहितने संघात केले दोन महत्त्वाचे बदल

>> चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

>>MI vs CSK: रोहितचे पलटन रोखणार का धोनीची चेन्नई एक्सप्रेस?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज