अ‍ॅपशहर

गुजरातविरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का, स्टार गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर

Big Blow to RCB: आज म्हणेजच २१ मे रोजी आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीतील महत्त्वचा सामना खेळायचा आहे. पण या सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा मॅचविनर गोलंदाज या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2023, 2:14 pm
बंगळुरू: आयपीएल २०२३मधील लीगचा शेवटचा सामना बेंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात होणार आहे. जिथे फाफ डुप्लेसिस आणि हार्दिक पांड्या आमनेसामने असणार आहेत. आरसीबीसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. मात्र महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच संघाला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीच्या संघातील महत्त्वाचा गोलंदाज आजच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यामुळे या खेळाडूची अनुपस्थिती संघासाठी डोकेदुखी तर ठरणार नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Josh Hazelwood Out of RCB Team (2)


आरसीबी विरुद्ध गुजरात यांच्यातील महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतग्रस्त झाला असून तो आपल्या मायदेशी परतत आहे. याशिवाय आयपीएल सोबतच २०२३ साठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही त्याचा सहभाग आहे. तथापि, आयपीएल २०२३च्या प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी आरसीबीला गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकावा लागेल. तर डब्ल्यूटीसी अंतिम फेरीपर्यंत तंदुरुस्त होणे हेझलवूडचे प्राधान्य आहे.

आरसीबीच्या अडचणी वाढल्या

उल्लेखनीय आहे की जोश हेजलवूड आरसीबीच्या पहिल्या आठ सामन्यांमध्ये खेळला नव्हता आणि तो फक्त तीन सामन्यांमध्ये खेळू शकला होता. ९ मे पासून तो मुंबई इंडियन्सविरुद्ध एकही सामना खेळलेला नाही. हा वेगवान गोलंदाज टाचेच्या दुखापतीतून सावरत होता. तसेच आरसीबी आधीच डेव्हिड विली आणि रीस टोपलीशिवाय खेळत होते जे दोघेही दुखापतीनंतर मायदेशी परतले आणि आता जोश हेझलवुड हा दुसरा प्रकार आहे. दरम्यान, ओव्हल फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघ २७ मे रोजी लंडनला रवाना होणार आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, रजत पाटीदार, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन अॅलन, सुयश प्रभू, फिन एलेन कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, हिमांशू शर्मा, मनोज भांडगे, राजन कुमार, अविनाश सिंग, सोनू यादव, मायकल ब्रेसवेल.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख