अ‍ॅपशहर

रोहित शर्मा इतिहास रचण्यासाठी एक पाऊल दूर, हार्दिक सोडा सचिनलाही ही गोष्ट जमली नाही

Rohit Sharma : हार्दिक पंड्या तर सोडा, जी गोष्ट सचिन तेंडुलकरलाही जमली नाही ती आता रोहित शर्मा करणारा असल्याचे समोर आले आहे. रोहित शर्मा असा कोणता मोठा रेकॉर्ड रचणार आहे, जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2024, 3:39 pm
मुंबई : रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी त्याचीच सर्वात जास्त चर्चा आहे. कारण चााहत्यांना रोहितला डोक्यावर घेतले आहे. दुसरीकडे रोहित शर्मा हा इतिहास रचण्यासाठी फक्त एक पाऊल दूर आहे. कारण आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणालाही करता आलेला नाही. कर्णधार हार्दिक पंड्या तर सोडाच, पण जी गोष्ट महान खेळाडू सचिन तेंडुलकरही जमली नाही ती आता रोहित शर्मा करणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आता रोहित शर्माचे पुढील सामन्यात खास सत्कार करण्याच्या तयारीत दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma
सौजन्य-मुंबई इंडियन्स


रोहित शर्मा या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात भन्नाट फॉर्मात दिसला. कारण रोहितने पहिल्या सामन्यात मुंबईचा डाव सावरला होता. मुंबईला पहिल्या तीन षटकांतच दोन धक्के बसले होते. पण त्यानंतर रोहित शर्माने धडाकेबाज कामगिरी केली आणि संघाला विजयाचा पाया रचू दिला होता. रोहित शर्माने या सामन्यात तिसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली होती. त्याचबरोबर ४३ धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. पण रोहित बाद झाला आणि तिथेच सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. पण आता या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना आता सनरायझर्स हैदराबादबरोबर होणार आहे, हा सामना २७ मार्चला खेळवला जाणार आहे. या सामन्यात आता रोहित शर्माला इतिहास रचण्याची संधी आहे. कारण आतापर्यंत हा रेकॉर्ड कोणालाच जमलेला नाही. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सकडून २०० वा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाकडून कोणत्याही खेळाडूला २०० सामने खेळता आलेले नाहीत. रोहित शर्मा जेव्हा २७ मार्चला हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्याचा मुंबई इंडियन्सकडून २०० वा सामना असणार आहे. ही गोष्ट आतापर्यंत सचिन तेंडुलकरलाही जमलेली नाही. त्यामुळे या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ त्याचा खास सत्कार करू शकते, हे समोर आले आहे. कारण रोहित हा आता मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामना खेळणार खेळाडू म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे हा सामना रोहितसाठी महत्वाचा ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सचा हा हा पुढील सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मासाठी हा सामान खास असणार आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा या आपल्या २०० व्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख