अ‍ॅपशहर

रोहित शर्माने वाढवलं मुंबई इंडियन्सचं टेन्शन, एलिमिनेटर तर जिंकली पण पुढे काय होणार?

Mumbai Indians: आता मुंबई इंडियन्स IPL 2023 च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ रोहितबाबत नक्कीच चिंतेत असेल. यामागची कारणे काय आहेत, जाणून घेऊया...

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2023, 2:05 pm
नवी दिल्ली: आयपीएलमध्ये ५ वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने यंदाच्या एलिमिनेट सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा ८१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश केला. मुंबईच्या संघातील सर्वच खेळाडूंनी आपली शानदार कामगिरी करत संघाला मोठा विजय मिळवून दिला. पण आकाश मढवालची या सामन्यातील कामगिरी कोणीही नक्कीच विसरू शकणार नाही. आयपीएलच्या आतापर्यंतच्या एलिमिनिटर सामन्यांमध्ये ५ विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. आता त्यांचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे, जो २६ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या विजयाचा मुंबईकरांना अभिमान वाटेल यात शंका नाही, पण अशा काही गोष्टी आहेत ज्या अजूनही चिंतेचा विषय आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma


लखनौविरुद्ध रोहित शर्मा १० चेंडूत ११ धावा करून बाद झाला. या हंगामात त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. मात्र, काही सामन्यांमध्ये त्याने निश्चितच शानदार फलंदाजी केली आहे. पण रोहितची शानदार खेळीही संघासाठी गेमचेंजिंग ठरू शकते, त्यामुळे त्याने आगामी सामन्यात धावा कारे संघासाठी फायदेशीर ठरेल.

रोहित शर्माने वाढवलं मुंबईचं टेन्शन

रोहित शर्माची क्वालिफायर, एलिमिनेटर आणि सेमीफायनल (फायनल वगळता) मधील कामगिरी पाहिली तर आपल्याला कळेल की नेमकं कोणतं टेन्शन मुंबईला आलं आहे. डावाच्या दृष्टीने पाहिले तर त्याने ५*, २, ०, १३, १४, ८, २, २०, १९, १, २६, ४, ०, ११ धावा खेळल्या आहेत. एकूण १४ सामन्यात १२५ धावा, सरासरी ९.६१ आणि स्ट्राइक रेट ८८०२ आहे. हे कोणत्याही अर्थाने मुंबईसाठी सकारात्मक लक्षण नाही.

अंतिम फेरीत पोहोचलेल्या चेन्नईविरुद्ध त्याची कामगिरी दमदार झाली आहे, यात शंका नाही. मात्र क्वालिफायरमध्ये गुजरातविरुद्धच्या सामन्याचा निकालही त्याच्या कामगिरीवर बरेच अवलंबून असेल. दुसरीकडे, हार्दिक पांड्या त्याच्यासोबत बराच काळ खेळला आहे आणि त्याला त्याच्या कमतरता माहित आहेत. गुजरातकडे रशीद खान आणि नूर अहमद हे दोन आश्वासक लेगस्पिनर आहेत.


२०२३ मध्ये रोहित शर्मा

रोहितने या मोसमात १५ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २१.६० च्या सरासरीने ३२४ धावा केल्या आहेत, तर दोन अर्धशतके लगावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६५ धावा आहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख