अ‍ॅपशहर

... तर हैदराबादविरुद्ध एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलबाहेर पडू शकतो, जाणून घ्या कसं...

एकही चेंडू न खेळता मुंबई इंडियन्सच्या संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण जर उद्याच्या सामन्यापूर्वी ही एक गोष्ट घडली तर सामना सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलबाहेर जाणार आहे. जाणून घ्या ती गोष्ट आहे तरी काय...

Maharashtra Times 8 Oct 2021, 10:25 am
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता वेगवेगळी समीकरणं पुढे येत आहेत. पण मुंबई इंडियन्सचा संघ सामना सुरु होण्यापूर्वीही आयपीएलच्या बाहेर जाऊ शकतो, अशी एक गोष्ट आता समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम रोहित शर्मा (सौजन्य-आयपीएल)

सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा संघ कोणत्या गोष्टीमुळे आयपीएलबाहेर जाऊ शकतो, पाहा...केकेआरने राजस्थानवर मोठा विजय मिळवला आणि मुंबई इंडियन्सला त्याचा मोठा धक्का बसला. त्यामुळे आता एक गोष्टी अशीही समोर आली आहे की, सामन्याचा एकही चेंडू न पडताच मुंबई इंडियन्सच्या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येऊ शकते. कारण आतापर्यंतची जी समीकरणं आली आहेत ती मुंबईने प्रथम फलंदाजी करत किती धावा केल्या पाहिजे, अशी आहेत. पण जर मुंबई इंडियन्सची प्रथम गोलंदाजी आली तर काय? कारण जर नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि त्यांनी जर प्रथम फलंदाजी स्विकारली तर मुंबई इंडियन्सचे काय होणार, हा प्रश्न आतापर्यंत बऱ्याच जणांना पडलेला नाही. पण जर नाणेफेकीनंतर मुंबई इंडियन्सची प्रथम गोलंदाजी आली तर त्यांचे आव्हान तिथेच संपुष्टात येणार आहे. कारण पहिली गोलंदाजी आल्यावर मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी कोणतेही समीकरण नाही, प्रथम फलंदाजी आल्यावर जर त्यांनी २००पेक्षा जास्त धावा केल्या तरच त्यांना प्ले-ऑफमध्ये जाता येऊ शकते. त्यामुळे उद्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सर्वात महत्वाचा असेल. जजर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली तर नक्कीच ते प्रथम फलंदाजी स्विकारतील आणि हैदराबादच्या संघाने मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न करतील, पण जर हैदराबादने नाणेफेक जिंकली तर मुंबई इंडियन्सला मोठी समस्या जाणवू शकते. कारण हैदराबाद फक्त एकाच निर्णयाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचे प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न प्रथम फलंदाजी स्विकारून बेचिराख करू शकते. त्यामुळे उद्या सर्वांचे लक्ष हे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या नाणेफेकीवर खिळलेले असेल. त्यामुळे नाणेफेक कोणता संघ जिंकतो आणि त्यानंतर कोणता निर्णय घेतला जातो, यावरच सर्व अवलंबून असणार आहे.

महत्वाचे लेख