अ‍ॅपशहर

IPLमध्ये पुन्हा करोनाचा शिरकाव; या खेळाडूला झाली लागण

T Natarajan tests positive for covid-19: आयपीएलच्या १४व्या हंगामातील दुसऱ्या सत्राच्या चौथ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. सामन्याच्या काही तास आधी खेळाडूला करोनाची लागण झाल्याचे समोर आलय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2021, 3:56 pm
दुबई: ज्या कारणामुळे मे महिन्यात भारतात सुरू झालेली आयपीएल २०२१ ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती, त्याच एका कारणामुळे आता पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. आयपीएलच्या सुरक्षित अशा बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम टी नटराजन


वाचा- ८ विकेट हातात असून ४ धावा निघाल्या नाहीत; लाजिरवाण्या पराभवानंतर भडकला कुंबळे

आयपीएलचे दुसरे सत्र युएईमध्ये १९ तारखेपासून सुरू झाले आहे. आतापर्यंत ३ लढती झाल्या आहेत. आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. पण त्याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबाद संघातील खेळाडूला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण संघाची पुन्हा एकदा आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे.

वाचा- एका ओव्हरने स्टार झालेला कोण आहे कार्तिक त्यागी; १९ वर्षाखाली वर्ल्डकप गाजवले आणि...

हैदराबाद संघातील जलद गोलंदाज टी नटराजन याला करोनाची लागण झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ही माहिती दिली आहे.

वाचा- Video: टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात गोल्डन ओव्हर; ८ विकेट असून ४ धावा...


वाचा- थरारक विजयानंतर संजू सॅमसनला मिळाली शिक्षा; लाखो रुपयांचा केला दंड

नटराजनला करोना झाल्याचे बुधवारी दुपारी स्पष्ट झाले. त्यानंतर बीसीसीआयने ही माहिती दिली. नटराजनच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद संघातील विजय शंकर, टीम मॅनेजर विजय कुमार, सायकोथेरेपिस्ट शाम सुंदर, डॉक्टर अंजना वनान, लाजिस्टिक मॅनेजर तुषार खेडकर आणि नेट गोलंदाज पेरियासमय यांना आयसोलेट करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख