अ‍ॅपशहर

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर भावनिक झाला खेळाडू; पाहा व्हिडिओ

आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला नवव्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. काल शनिवारी झालेल्या लढतीत मुंबईने राजस्थानचा पराभव केला.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2022, 2:32 pm
मुंबई: पाच विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२२मध्ये सलग आठ पराभव झाले. आयपीएलच्या इतिहासात आजवर कोणत्याही संघाने सुरुवातीचे ८ सामने गमावले नाहीत. प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबई इंडियन्सला शनिवारी झालेल्या नवव्या लढतीत पहिला विजय मिळाला. या विजयानंतर संघातील स्टार सलामीवीर ईशान किशन भावनिक झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई इंडियन्स
mumbai indians 2022


वाचा- पुजाराला रोखणे अशक्य; सलग दुसरे द्विशतक, २८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर १५९ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबईने हे लक्ष्य चार चेंडू राखून पार केले. सूर्यकुमार यादववने ५१ तर तिलक वर्माने ३५ धावा केल्या. सलामीवीर ईशान किशनने १८ चेंडूत २६ धावा केल्या. सामना झाल्यानंतर ईशान म्हणाला, संघासाठी हा फार कठीण काळ असून आम्हा सर्व खेळाडूंना एकमेकांसोबत राहण्याची गरज आहे.

वाचा- एलन मस्क तुम्ही Swiggy विकत घ्या; शुभमन गिलचे ट्विट

आमच्यासाठी हा सोपा काळ नव्हता पण आम्ही एकमेकांना साथ देणे गरजेचे आहे. तयारीवर फोकस करायचा आहे. मला आनंद आहे की आम्ही आज विजय मिळवला. क्रिकेटमध्ये सर्व काही होत राहते. तुम्ही विकेट गमावता, धावा करता. मात्र आज प्रत्येक फलंदाज फिनिशरच्या भूमिकेत मैदानात उतरला होता. मला आशा आहे की आगामी सामन्यात देखील आम्ही मॅच जिंकू.


रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली. कर्णधार रोहित फक्त २ धावांवर बाद झाला. पण त्यानंतरच्या फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी केली. ईशानने १८ चेंडूत २६, सूर्यकुमार यादवने ३९ चेंडूत ५१, तिलक वर्माने ३० चेंडूत ३५, टीम डेव्हिडने ९ चेंडूत नाबाद २० तर डॅनियल सॅम्सने १ चेंडूत ६ धावा केल्या.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख