अ‍ॅपशहर

फक्त दोन संघ आणि BCCIला होणार ५ हजार कोटींचा फायदा

New Ipl Teams In 2022: २०२२ साली होणाऱ्या आयपीएलच्या १५व्या सत्रात दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार आहे. यामुळे बीसीसीआयला ५ हजार कोटी रुपायंचा फायदा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2021, 11:38 am
नवी दिल्ली: नव्या वर्षातील आयपीएल मोसमात दोन नव्या संघांचा समावेश होणार आहे. यामुळे भारतीय क्रिकेट मंडळास (बीसीसीआय) किमान पाच हजार कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे. सध्या आयपीएल आठ संघांत होते. २०२२ च्या मोसमापासून ती दहा संघाची होईल. आयपीएल प्रशासकीय समितीदोन नव्या संघांसाठीची निविदा प्रक्रिया निश्चित केली आहे. नव्या संघासाठीची निविदा दहा लाख रुपये देऊन खरेदी करता येईल, असे जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आयपीएल आणि बीसीसीआय


वाचा- ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा देशवासियांना म्हणाला, कृपया तुम्ही...

नव्या संघांसाठी भारतीय मंडळाने आधार मूल्य आता दोन हजार कोटी निश्चित केले आहे. सुरुवातीस ही रक्कम सतराशे कोटी होती. अपेक्षेनुसार संघांचा लिलाव झाल्यास याद्वारे किमान पाच हजार कोटी रुपयांची कमाई होईल, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. त्यासाठी वार्षिक तीन हजार कोटी उलाढाल असलेल्या कंपन्यांनाच लिलावात प्रवेश देण्याचा विचार होत आहे. या संघांच्या खरेदीतील चुरस वाढवण्यासाठी काही कंपन्यांनी एकत्र येऊन बोली लावल्यासही ती स्वीकारण्याचा विचार होत आहे.

वाचा- चौथ्या कसोटीसाठी इशांतला मिळणार डच्चू; असा असेल संभाव्य संघ

नव्या संघाच्या फ्रँचाईजसाठी अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे यांच्यात चुरस असेल असे मानले जात आहे. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम तसेच लखनऊचे इकाना स्टेडियम फ्रँचाईजना आकर्षित करेल, असा कयास आहे.

बीसीसीआयला कमीत कमी ५ हजार कोटींचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. आयपीएलच्या पुढील सत्रात ७४ सामने होणार आहेत. त्यामुळे सर्वांचा फायदा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

वाचा- भारतीय खेळाडूंनी इतिहास घडवला, पॅरालिम्पिकमधील पदकांची संख्या दुहेरी

बोलीसाठी वर्षाला ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपन्यांना संधी दिली जाणार आहे. इतक नव्हे तर कंपन्यांच्या समूहाला देखील संघ खरेदी करण्याची संधी दिली जाणार असून यासाठी योजना तयार केली जात आहे. तीन पेक्षा अधिक कंपन्यांच्या समूहाला बोलीत सहभागी होऊ दिले जाणार नाही.

आयपीएलच्या १४व्या हंगामातील ३१ लढती अद्याप शिल्लक आहेत. या लढती युएईमध्ये आयोजित केल्या जाणार आहे.

महत्वाचे लेख