अ‍ॅपशहर

बिखरने का मुझको शौक़ है बड़ा! पराभवानंतर कोहलीने तोंड लपवलं, सिराज हवालदिल, अनुष्का तर...

RCB vs GT : शुभमन गिलने शतक झळकवताच सिराजच्या चेहऱ्यावर दुःख पसरलं. टीमला प्लेऑफमधून बाहेरचा रस्ता धरावा लागला आणि मैदानातच बंगळुरु संघ निराश होऊन बसला.

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2023, 12:55 pm
मुंबई : आयपीएल २०२३ मधील शेवटच्या लीग मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासोबत चाहत्यांचाही 'विराट' स्वप्नभंग झाला. कारण गुजरात टायटन्सविरोधात प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणं कुठल्याही परिस्थितीत आवश्यक होतं. परंतु शुभमन गिलने बंगळुरुचे इरादे खिळखिळे केले. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या दमदार शतकानंतरही बंगळुरुच्या पदरी पराभवच आला. अखेर कोहलीसह सगळेच खेळाडू हवालदिल होऊन बसल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IPL RCB Virat Kohli
बंगळुरु संघ हवालदिल


शुभमन गिलने शतक झळकवताच मोहम्मद सिराजच्या चेहऱ्यावर दुःख पसरल्याचं दिसलं. टीमला प्लेऑफमधून बाहेरचा रस्ता पकडावा लागला आणि मैदानातच बंगळुरु संघ निराश होऊन बसला. कोहली नाराज झाला होता. शतक झळकावूनही आपल्या संघाला प्लेऑफचे तिकीट मिळवून देता न आल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मोहम्मद सिराज बराच वेळ मैदानात दुःखावेगात बसला होता.

विशेष म्हणजे पराभवाच्या दुःखातही बंगळुरु संघ आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त करायला विसरला नाही. संघातील क्रिकेटपटूंनी स्टेडियमवर आलेल्या हजारो चाहत्यांना धन्यवाद म्हटले.

शाहरुख खानचा खरा हिरो ठरलेल्या रिंकू सिंगचे पाय जमिनीवर! टीम इंडियातील निवडीवर मन जिंकणार वक्तव्य
विराटने खरं तर हा सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. सलग दुसऱ्या सामन्यात त्याने शतक झळकावलं. ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सातवी सेंच्युरी होती. शतकानंतर अनुष्काने त्याला स्टँडमधून फ्लाईंग किसही दिलं. मात्र बंगळुरुच्या पराभवानंतर तिचाही चेहरा उतरला.


गुजरातने सामना गमावला तरी फरक पडला नसता, पण शुभमन गिलने आपल्या खेळीने सर्वांना भुरळ घातली. त्याने सलग दुसरे शतक झळकावत कोहलीच्या शतकावर भदाभदा पाणी ओतलं. आरसीबी आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात ही सल पुढचा काही काळ कायम राहील. कारण कोहली आणि सिराज यांच्यासाठी ही ट्रॉफी महत्त्वाची आहे.
लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख