अ‍ॅपशहर

कोणत्या दोन गोष्टीमुळे CSK थेट फायनलमध्ये पोहोचू शकते, जाणून घ्या मॅचविनिंग गोष्टी...

CSK vs GT Qualifier 1 : चेन्नईचा संघ आता थेट फायनलमध्ये पोहोचू शकतो. पण त्यासाठी त्यांना या दोन गोष्टी कराव्या लागतील. या दोन गोष्टी नेमक्या आहेत तरी कोणत्या जाणून घ्या.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 23 May 2023, 5:21 pm
चेन्नई : गुजरातविरुद्ध दोन हात करण्यासाठी चेन्नईचा संघ आता सज्ज झाला आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता कर्णधार धोनीने चांगलाच गेम प्लॅन आखला आहे. कारण आता फक्त दोन गोष्टी त्यांना अंतिम फेरीत पोहोचवू शकतात, असे समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम GT vs CSK
सौजन्य-आयपीएल

पहिली गोष्ट...
आयपीएल ही फलंदाजीसाठी ओळखली जाते आणि चेन्नईचा फलंदाजी ही सध्या चांगली होत आहे. कारण चेन्नईने आतापर्यंत बरेच सामने फक्त फलंदाजीच्या जोरावर जिंकले आहेत. चेन्नईचे दोन्ही सलामीवीर भन्नाट फॉर्मात आहेत. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये तुफानी फटकेबाजी केली आहे. बऱ्याचदा त्यांना संघाला शतकी सलामीही करून दिली आहे. त्यामुळे चेन्नईचे सलामावीर हे त्यांच्या संघासाठी महत्वाचे असतील. त्याचबरोबर चेन्नईच्या संघाने आतापर्यंत अखेरच्या षटकांमध्येही चांगल्या धावा उभारल्या आहेत. रवींद्र जडेजा, शिवम दुबेसारखे खेळाडू अखेरच्या षटकात धमाकेदार फलंदाजी करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनी हा अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला येऊन तुफानी फटकेबाजी करत आहे. त्यामुळे चेन्नईची फलंदाजी नेमकी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

दुसरी गोष्ट....
चेन्नईच्या संघात युवा गोलंदाज आहेत, असे म्हटले जात आहे. पण चेन्नईच्या संघात रवींद्र जडेजा आणि मोईन अलीसारखे अनुभवी फिरकीपटूही आहेत. या दोन फिरकीपटूंच्या भोवती चेन्नईचा संघ विजयाची पताका उचावू शकतो. कारण चेन्नईची खेळपट्टी ही संथ फिरकीला पोषक ठरणारी आहे. कारण या आता चेन्नईची खेळपट्टी ही संथ झालेली आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे जडेजा आणि मोइन यांची फिरकी महत्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर या महेश तीक्ष्णा हा देखील चांगली गोलंदाजी करत आहे. त्यामुळे हे तिघे या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करतात, हे चेन्नईसाठी महत्वाचे असेल.

चेन्नईला हा सामना जिंकायचा असेल त्यांच्यासाठी सलामी आणि फिरकी गोलंदाजी या दोन गोष्टी चेन्नईसाठी महत्वाच्या ठरतील आणि त्यांना थेट अंतिम फेरीत घेऊन जातील.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख