अ‍ॅपशहर

पश्चिम विभागाचा विजय

इरफान पठाणची प्रभावी गोलंदाजी आणि पार्थिव पटेलच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर विभागाचा आठ विकेटनी पराभव केला.

Maharashtra Times 14 Feb 2017, 4:00 am
मुंबईः इरफान पठाणची प्रभावी गोलंदाजी आणि पार्थिव पटेलच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर पश्चिम विभागाने सईद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर विभागाचा आठ विकेटनी पराभव केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम irfan kishan shine on day two of t20 league
पश्चिम विभागाचा विजय


वानखेडे स्टेडियममध्ये ही लढत झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या उत्तर विभागाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर शिखर धवन अपयशी ठरला. त्याला केवळ तीन धावा करता आल्या. इराफानने त्याला केदार जाधवकरवी झेलबाद केले. गौतम गंभीरने एकाकी झुंज दिली. त्यामुळे उत्तर विभागाला शतकी टप्पा पार करता आला. गौतमने ५८ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ६० धावांची खेळी केली.

प्रत्युत्तर देताना श्रेयस अय्यर आणि पार्थिव पटेल यांनी पश्चिम विभागाला धडाक्यात सुरुवात करून दिली. त्यांनी ५४ चेंडूंत ८० धावांची सलामी दिली. परवेझ रसूलने श्रेयसला बाद करत ही जोडी फोडली. श्रेयसने २६ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह ३० धावांची खेळी केली. बाराव्या षटकात मोहित शर्माने पार्थिवला बाद केले. पार्थिवने ३५ चेंडूंत नऊ चौकारांसह ५६ धावांची खेळी केली. त्यानंतर आदित्य तरे (नाबाद १४) आणि अंकित बावणे (नाबाद ४) यांनी पश्चिम विभागाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्कोअरबोर्डः उत्तर विभाग २० षटकांत ८ बाद १०७ (गौतम गंभीर ६०, मयंक डागर ११, इरफान पठाण ३-१०) पराभूत वि. पश्चिम विभाग १२.४ षटकांत २ बाद १०८ (पार्थिव पटेल ५६, श्रेयस अय्यर ३०).

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज