अ‍ॅपशहर

पुजाराचे प्रोत्साहन मोलाचे

आपल्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे मी शतक साजरे करू शकलो आणि ही खेळी माझी आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे, अशा शब्दांत भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा याने आपल्या शतकी खेळीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

Maharashtra Times 20 Mar 2017, 1:01 am
रांची : आपल्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या आत्मविश्वासामुळे मी शतक साजरे करू शकलो आणि ही खेळी माझी आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे, अशा शब्दांत भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा याने आपल्या शतकी खेळीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम its my best test knock saha
पुजाराचे प्रोत्साहन मोलाचे


साहा म्हणाला की, मी आतापर्यंत केलेल्या तीन खेळींपैकी ही सर्वोत्तम आहे. आम्हाला त्यावेळी मोठ्या भागीदारीची गरज होती. ही भागीदारी आम्ही हळूहळू खुलविली. मला वेळोवेळी पुजाराने प्रोत्साहन दिले. सकारात्मक राहण्याचा सल्ला तो मला वारंवार देत होता. मीदेखील तो सल्ला मानला आणि त्याचे फळ मला मिळाले. पुजाराने मला छोटी छोटी भागीदारी करण्यास सांगितले.

साहाने सांगितले की, मी माझ्या फलंदाजीच्या शैलीत बदल केला नाही. मी स्वतःलाच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत होतो. कारकीर्दीच्या प्रारंभी मला स्विप व पुढे येऊन फटका खेळण्याविषयी शंका होती पण आता ती शंका दूर झाली आहे.

साहाने पुजारासह शेष भारताकडून खेळताना केलेल्या ३१६ धावांच्या भागीदारीचीही आठवण सांगितली. या भागीदारीमुळे शेष भारताला गुजरातविरुद्ध सहा विकेटसनी विजय मिळविता आला.

आम्हाला जाडेजाचे आव्हान

लेहमन यांची कबुली

ऑस्ट्रेलियाला आता या सामन्यात आणखी १२९ धावांची गरज असली तरी त्यांच्यासमोर आव्हान असेल ते रवींद्र जाडेजाच्या फिरकीचे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी ही कबुली दिली.

जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना बाद करत भारताची पकड मजबूत केली आहे.

लेहमन म्हणाले की, जाडेजाच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा याची तयारी आम्ही करत आहोत. उद्याच ते आपल्याला पाहायला मिळेल. आमच्यासाठी ते मोठे आव्हान आहे. मुख्य म्हणजे काही भागीदाऱ्या होणे गरजेचे आहे तरच आम्ही यशस्वी ठरू.

लेहमन यांनी सांगितले की, वॉर्नर ज्या चेंडूवर बाद झाला तो उत्कृष्टच होता. असे १० चेंडू त्यांनी टाकले तर त्याचे परिणाम दिसतीलच. पण या चेंडूंचा सामना करण्याचे डावपेच आम्हाला तयार ठेवावे लागतील. आम्ही त्यासाठी भरपूर सरावही केला आहे. आता ते कसे होते हेच पाहायचे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज