अ‍ॅपशहर

गूढ आजारामुळे हास्टिंगची निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हॅस्टिंग्जने गूढ आजारपणामुळे तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. गोलंदाजी करतानाच, त्याच्या थुंकीतून रक्त पडत आहे. त्यामागील कारणांचे निदान होत नसून, त्यातून त्याचा मृत्यू होण्याचीही भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हॅस्टिंग्जने निवृत्ती जाहीर केली आहे.

Maharashtra Times 15 Nov 2018, 2:55 am
वृत्तसंस्था, मेलबर्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम John-Hastings

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन हॅस्टिंग्जने गूढ आजारपणामुळे तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. गोलंदाजी करतानाच, त्याच्या थुंकीतून रक्त पडत आहे. त्यामागील कारणांचे निदान होत नसून, त्यातून त्याचा मृत्यू होण्याचीही भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हॅस्टिंग्जने निवृत्ती जाहीर केली आहे.

ऑस्ट्रेलिया संघासाठी ३३ वर्षांचा हॅस्टिंग्ज एक कसोटी, नऊ ट्वेंटी-२० आणि २९ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळला आहे. याशिवाय, देशांतर्गत बिग बॅश स्पर्धेमध्येही तो खेळत आहे. यंदाच्या स्पर्धेसाठीही त्याचा सराव सुरू होता. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याला अनेक वर्षांपूर्वीच रक्त पडत असल्याचे लक्षात आले होते. मात्र, सातत्याने उपचार व शस्त्रक्रिया केल्यानंतरही काहीच फरक पडला नाही. विविध चाचण्यांनंतरही आजाराचे निदान झालेले नाही. गोलंदाजी करताना, रक्तवाहिन्यांवर दबाव येतो आणि त्यातून फुफ्फुसे फुटू शकतात. रक्त येणे हे नेहमीचे झाले असून, ही खूप भीतीदायक गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज