अ‍ॅपशहर

प्रशिक्षकपदासाठी जोशी, पोवार इच्छुक

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण वीस इच्छुकांचे अर्ज आले असून, त्यामध्ये भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी आणि रमेश पोवार यांचाही समावेश आहे. या इच्छुकांच्या १० ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मुलाखती होणार आहेत.

Maharashtra Times 10 Aug 2018, 4:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम powar


भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण वीस इच्छुकांचे अर्ज आले असून, त्यामध्ये भारताचे माजी फिरकीपटू सुनील जोशी आणि रमेश पोवार यांचाही समावेश आहे. या इच्छुकांच्या १० ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मुलाखती होणार आहेत.

जोशी व पोवार यांच्याप्रमाणेच माजी यष्टिरक्षक अजय रात्रा, विजय यादव, महिला संघाच्या माजी कॅप्टन ममता माबेन आणि सुमन शर्मा यांनीही अर्ज भरले आहेत. सुमन शर्मा यांनी यापूर्वी भारतीय महिला संघाच्या सहायक प्रशिक्षिका म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू मारिया फाहाय यासुद्धा भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. ३४ वर्षीय फाहाय यांनी २ कसोटी आणि ५१ वन-डे क्रिकेट सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले असून, सध्या त्या गुंटूर येथील एसीए अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इच्छुकांपैकी जोशी आणि पोवार हे प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. पोवार हे सध्या अंतरिम प्रशिक्षक म्हणून काम पाहात असून, त्यांच्याकडे ३१ आंतरराष्ट्रीय वन-डे व २ कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. जोशी यांनी भारताकडून १५ कसोटी आणि ६९ वन-डे खेळल्या असून त्यांनी ओमान आणि बांगलादेशचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि हैदराबाद या संघांचे प्रशिक्षक होते.

बीसीसीआयच्या प्रशासन समितीच्या सदस्य डायना एडल्जी, क्रिकेट ऑपरेशन्स विभागाचे सरव्यवस्थापक सबा करीम आणि बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी हे प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज